बाँयफ्रेंडसोबत वाद, पायलट तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; उडाली एकच खळबळ
Pilot girl commits suicide in Mumbai- मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या एका पंचवीस वर्षिय तरुणीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली. विशेष म्हणजे आत्महत्या केलेली तरुणी ही एका खासगी विमान कंपनीत पायलट असल्याचे समोर आले आहे. आपल्या बाँयफ्रेंडसोबत वाद झाल्यानंतर तरुणीने आपले आयुष्य संपविल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सृष्टी तुली असे या तरुणीचे नाव असून पोलिसांनी तिचा बाँयफ्रेंड आदित्य पंडीत याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

मृत तरुणी होती पायलट
मृत सृष्टी ही एका खासगी विमान कंपनीत पायलट म्हणून नोकरी करत होती. अंधेरी परिसरात ती राहत होती. अंधेरी पोलिसांना आज सकाळी आठ वाजता या प्रकाराची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत मृत तरुणीला तत्काळ घाटकोपर येथील राजवाडी रुग्णालयात आणले. तेथील डाँक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर तिचे शवविच्छेदन करण्यात आले. पोस्टमाँर्टम रिपोर्टमध्ये या तरुणीचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाल्याचे सिद्ध झाले. तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे डाँक्टरांचे म्हणणे आहे.
बाँयफ्रेंडसोबत होते वाद
मृत सृष्टी ही एअर इंडियामध्ये पायलट होती. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, पोलिसांनी या तरुणीच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले. सृष्टीचा तिच्या बॉयफ्रेंडसोबत वाद झाला होता, दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. त्यातूनच ती त्रस्त होती, म्हणून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
बाँयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल
नातेवाईकांच्या माहितीवरुन सृष्टी व तिच्या बाँयफ्रेंडमध्ये सतत वाद होत होते. त्यामुळे सृष्टी तणावात होती. त्यामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर पोलिसांनी सृष्टीचा बाँयफ्रेंड आदित्य पंडीत (वय २७) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकारानंतर मुंबईत एकच खळबळ उडाली.












Click it and Unblock the Notifications