लाडक्या बहिणींना धमकी देणारे भाजप नेते महाडिक अडचणीत!निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर जोरदार हल्लाबोल चढवत आहेत. दुसरीकडे महायुतीतील नेते हे लाडकी बहीण योजनेचा मुद्दा पुढे करून प्रचार करत आहेत. अशातच, कोल्हापुरात भाजप नेते धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेवरुन महिलांना धमकीच दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. अशातच निवडणूक आयोगा देखील अॅक्शनमोडमध्ये आले आहे. त्यांनी थेट धनंजय महाडिक यांना वादग्रस्त विधानामागील कारण सांगा, असे म्हणत नोटीस बजावली आहे.

नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय?
भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी (ता.करवीर, जि. कोल्हापूर) येथील जाहीर सभेत केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता-2023 कलम 179 अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आल्याने आयोगाकडून त्यांना नोटिस बजावण्यात आली आहे. त्यामुळे याबाबतचा खुलासा तत्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून यांनी धनंजय महडिक यांना दिली आहे.
काय म्हणाले धनंजय महाडिक?
धनंजय महाडिक म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या. आम्ही त्यांची व्यवस्था करतो. घ्यायचे आपल्या शासनाचे आणि गायचे त्यांचे असे चालणार नाही. महाडिक पुढे म्हणाले की, अनेक ताया महाराष्ट्रात आहेत, छाती बडवत आहेत. आम्हाला नकोत पैसे, आम्हाला नकोत आम्हाला सुरक्षा पाहिजे. पैसे नकोत? राजकारण करता पैशांचे? काँग्रेसच्या सभेला महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे, आम्ही व्यवस्था करतो त्यांची, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यात त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली.












Click it and Unblock the Notifications