उद्धव ठाकरेंच्या बॅग चेकिंगवर ECI चा खुलासा, नेमकं काय म्हणाले आयोग, वाचा सविस्तर!
Uddhav Thackeray Bag Checking Issue : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची विमानतळावर चेकिंग करण्यात आल्याने ठाकरे चांगलेच संतापले, तर मोदी-शहांची देखील तपासणी करता का, असा सवाल त्यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांवर उपस्थित केला. त्यावर आता निवडणूक आयोगाच्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगातील सूत्रांच्या हवाल्याने एका अहवालात म्हटले आहे की, ECI मतदान पॅनेलने म्हटले आहे की बॅग तपासणे ही विमानतळावर एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (SOP) आहे, ज्याचे पालन केले गेले आहे.

सलद दुसऱ्यादिवशीही ठाकरेंची बॅग तपासली
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची मंगळवारी (12 नोव्हेंबर) पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्याचा हा सलग दुसरा दिवस होता, अशा परिस्थितीत राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचेही वक्तव्य आले आहे. ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील सामानाचे वारंवार चेकिंग केल्याने गेहलोत यांनी भाजपवर आरोप केला आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील जोरदार निशाणा साधला.
While the Entirely Compromised commission shamelessly carries on trying to delay Uddhav Thackeray ji to his sabhas by frisking, the question is, why isn’t the PM or other ministers visiting Maharashtra to promote bjp’s loot being frisked this way?
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 12, 2024
What a disgrace it’s turning… https://t.co/PxPKKsPhTu
वाद वाढताच निवडणूक आयोगाचा खुलासा
दरम्यान, वाढता वाद पाहता निवडणूक आयोगाने निवेदन दिले. सूत्रांचा हवाला देत निवडणूक आयोगाने आपल्या ताज्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की उद्धव ठाकरे यांची बॅग प्रमाणित कार्यपद्धतीनुसार तपासण्यात आली आहे.
यवतमाळमध्ये पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्यात आली. निवडणूक प्रचारासाठी ते या आठवड्यात सोमवारी येथे पोहोचले होते. त्यानंतर लातूरमध्ये पुन्हा त्यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. अशा स्थितीत निवडणूक अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या बॅगांचाही देखील तपासणी करणार आहेत की नाही, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित आहे.
'मी माझी जबाबदारी पार पाडीन'
बॅग चेकिंगसाठी आलेल्या अधिकाऱ्यांचे खिसे आणि व आयकार्ड तपासा असा आदेश ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला होता. तर आपण निवडणूक अधिकाऱ्यांवर नाराज नसल्याचे ठाकरे म्हणाले. मात्र, "तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडत आहात आणि मी माझी जबाबदारी पार पाडेन. तुम्ही ज्या पद्धतीने माझी बॅग तपासली, त्याप्रमाणे तुम्ही मोदी आणि शहा यांच्या बॅगा तपासणार का?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
आप खासदार म्हणाले- जनताल बदला घेईल
आपचे खासदार संजय सिंह म्हणाले - बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी गैरवर्तन करण्याचे धाडस महाराष्ट्रात कोणाचेच नव्हते. पण कुटनिती वापरून भाजपने हा पक्ष फोडला. दुसरं म्हणजे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याशी ज्या प्रकारे गैरवर्तन केले जात आहे. त्यातून महाराष्ट्रातील जनता योग्य तो महायुतीला धडा शिकवणार आहे.
संजय सिंह म्हणाले- उद्धव ठाकरेंना प्रचाराची परवानगी नाही का? ते त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करू शकत नाहीत का? अमित शहांच्या हेलिकॉप्टरची कधी तपासणी करण्यात आली होती का? नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरची कधी तपासणी झाली होती का?, मुळात विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम भाजपप्रणित निेवडणूक आयोगाकडून केला जात आहे.












Click it and Unblock the Notifications