आमदार निवासात राडा! शिंदेंसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची कँटीन चालकाला मारहाण! काय आहे कारण?
Eknath Shinde's MLA Sanjay Gaikwad assaults canteen employee : शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या आमदाराने आमदार निवासात कँटीनचालकाच्या कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिळा भात आणि डाळ दिल्याचा आमदार संजय गायकवाड यांचा आरोप आहे. हा प्रकार ८ जुलैला आकाशवाणी येथील आमदार निवासात घडला.
दरम्यान, या आमदाराने गरीब असहाय व्यक्तीला मारहाण केल्याचे म्हटले जात असून हा प्रकार पाहून सर्वजण थक्क झाले तर सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओत बनियानवर असलेले आमदार गायकवाड कानशिलात लगावताना दिसत आहेत. तसेच जाब विचारत मारताना दिसत आहेत.

नेमकं काय घडलं?
आमदार निवासातील कँटीनमध्ये मंगळवारी बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवण मागवले. त्यांना जेवण देण्यात आले पण त्यात डाळ आणि भात शिळा होता आणि त्याचा वासही येत होता, असा त्यांचा दावा आहे. यानंतर आरोप करत आमदार गायकवाड यांनी कँटीनचालकाकडे आपला मोर्चा वळवला. यावेळी त्यांनी तक्रार करत कुणीही कँटीनचे बील देऊ नका असे म्हटले आणि कँटीनच्या काऊंटरवर बसलेल्या चालकाच्या कानशिलात लगावली.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल, विधानसभेत आवाज उठवणार
आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपण यापुर्वी कँटीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता या कँटीनमधील जेवणाबद्दल विधानसभेत आवाज उठवणार असे त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊतांचे फडणवीसांना शेलक्या भाषेत आव्हान
मा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर अर्पण!
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 9, 2025
हे चित्र खरे असेल तर आपली यावर काही action आहे काय?
तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत!@Dev_Fadnavis @narendramodi @AmitShah https://t.co/l5hWu5uQV2
संजय राऊत यांनी यावर भाष्य केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, " गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर अर्पण! हे चित्र खरे असेल तर आपली यावर काही action आहे काय? तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत!" असे म्हणत त्यांनी एक व्हिडिओ एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे.
शिवसेना युबीटी नेत्या प्रियंका चतुर्वेदींची टीका
Meet Shah Sena’s MLA Sanjay Gaikwad. Last year he had threatened&announced 11 lakh rupees to anyone who cuts off Sh. Rahul Gandhi’s tongue. Now the man is seen beating up a poor helpless canteen worker. But wait no news TV outrage here since its a BJP ally pic.twitter.com/XVwnEzJFSU
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) July 9, 2025
शिवसेना युबीटी नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी एकनाथ शिंदे यांचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, " शाह सेनेचे आमदार संजय गायकवाड यांना भेटा. गेल्या वर्षी त्यांनी राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्याला ११ लाख रुपये देण्याची धमकी दिली होती आणि जाहीर केले होते. आता तो माणूस एका गरीब असहाय्य कॅन्टीन कामगाराला मारहाण करताना दिसत आहे. पण टीव्हीवरील आक्रोशाची बातमी ऐकू नका कारण तो भाजपचा मित्र आहे."
सोशल मीडियावर पोस्ट
एका युजर्सने संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्याने "एकनाथ शिंदे यांचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात निकृष्ट जेवण दिल्याबद्दल एका गरीब आणि निःशस्त्र कर्मचाऱ्याला मारहाण केली, व्हिडिओमध्ये आमदाराने त्याला कसे मारहाण केली हे स्पष्टपणे दिसून येते.. पण हा माणूस भाजपच्या मित्रपक्षाचा असल्याने, याला मुद्दा बनवले जाणार नाही, दिल्लीतील मीडियाचे लोक याला गुंडगिरी म्हणणारी कोणतीही मोहीम चालवणार नाहीत.. ही बातमी तुम्हाला दिल्लीतील मीडियामध्ये कुठेही दिसणार नाही..." असे म्हटले आहे.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तुमचे राशीभविष्य; नववर्षाचा सूर्य कोणासाठी ठरेल भाग्यवान?







Click it and Unblock the Notifications