सीएमपदाची संधी सोडून एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेंसाठी उपमुख्यमंत्रीपदाचा रस्ता मोकळा करत आहेत का?
Eknath Shinde : राज्यात विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीनंतर महायुतीला मोठे यश मिळाले. यानंतर मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा जोर धरत आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे, कारण आज (27 नोव्हेंबर) रोजी शिंदे यांनीच पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदाची संधी सोडत असल्याचे स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असे सांगितले.
आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार नाही,तर दुसरीकडे एकनाथ शिंदे केंद्रात जातील असे सांगण्यात येत आहे. असे असले तरीही एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्रात सध्या वाढता प्रभाव पाहता ते केंद्रात जातील याची शक्यता नाही त्यामुळे एकनाथ शिंदे राज्यातच राहतील हे नक्की झाले आहे.

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदावरुन उपमुख्यमंत्रीपदावर डिमोशन स्वीकारले, पण एकनाथ शिंदे डिमोशन स्वीकारणार नाही हे नक्की दिसते, पण एकनाथ शिंदे हे त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदेंना महाराष्ट्राच्या राजकारणात आणतील अशी शक्यता जास्त आहे. मुख्यमंत्रीपदाचा त्यात त्यांनी मुलासाठी केला आहे का? ही चर्चा आज सुरु आहे. मुलाला उपमुख्यमंत्रीपदासाठीचा रस्ता तयार करत असल्याची शक्यता जास्त असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या रेसमधून एकनाथ शिंदे मागे हटले
एकीकडे मुख्यमंत्री नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर आज खुद्द एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले की, मी नाराज नाही. त्यांनी त्यांच्या खास शैलीत मी रडणारा नाही तर लढणारा आहे असे म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी आपण मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही असे म्हणत स्पष्टपणे हा निर्णय भाजपवर सोडला. भाजपने या निवडणुकीत सर्वात जास्त 132 जागा पटकावल्या. म्हणजेच भाजपचाच मुख्यमंत्री होईल आणि ही संधी भाजप सोडणार नाही. त्यामुळे त्यांनी आज एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून माघार घेतली हेच दिसते.
मुख्यमंत्रीपदाबाबत काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, "मी नाराज होऊन रडणारा नाही. आम्ही लढणारे नेते आहोत. आमचे घोडे कुठेही अडले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी फोन केला आणि सांगितले की, तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्ष संधी दिली. त्यामुळे तुम्ही तुमचा निर्णय घ्या. तुमचा निर्णय जसा भाजपला अंतीम आहे तसा आमच्यासाठी अंतीम राहील. माझ्या भावना मी त्यांना सांगितला माझा अडसर राहणार नाही. जो निर्णय घ्यायचा तो घ्या. मी एवढे काम केले आणि काम करणारा कार्यकर्ता आहे. महायुती मजबूत आहे. महायुती जेवढ्या मजबुतीने वाढली त्यानुसार आता मतांचा आदर करुन आम्हाला गतीमान निर्णय घ्यायचे आहे."
असली उडाण बाकी हैं...!
"असली उडाण बाकी हैं. अभी तो नापी हैं मुठ्ठीभर जमीन अभी तो सारा आसमान बाकी हैं. असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्राला केंद्राचा फायदा नक्कीच होईल. भाजप नैतृत्व जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचे पुर्ण समर्थन राहील. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी पाठबळ दिले. मला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. माझ्या कामांबद्दल मी समाधानी आहे. अडीच वर्षांत घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहे. " असेही ते म्हणाले.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications