लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, CM शिदेंनी सांगितली तारीख, प्रचाराचा नारळही फोडला
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. त्यांनी आज कुर्ल्या मतदारसंघाचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी पहिली प्रचार सभा घेतली. यावेळी बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला .
मुख्यंमंत्री शिंदे यांनी लाडकी बहिणसह सरकारच्या इतर योजना विरोधी पक्ष बंद करण्याच्या गोष्टी करत आहेत. पण कल्याणकारी योजनांमध्ये खोडा घालणाऱ्यांना तुम्ही जोडा दाखवा, असे आवाहन त्यांनी महिलांना केले.

लाडक्या बहिणींना कधी मिळणार पैसे
मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, ही विधानसभा निवडणूक संपताच आम्ही महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे टाकणार आहोत. कारण, पुन्हा आमचंच सरकार येणार आहे, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला
मुख्यमंत्री शिंदेंनी कुर्ल्यातून प्रचाराचा नारळ फोडला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी आज पहिली सभा कुर्ला मतदारसंघात घेतली. कुडाळकर यांना पुन्हा येथील जनता साथ देईल, असा विश्वास देखील शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांचा देखील समाचार घेतला.












Click it and Unblock the Notifications