वयामुळे खडसे भ्रमिष्ट झाले- चंद्रकांत पाटलांची टीका; "पाटील तू नेमका आहे तरी कोणाचा"- नाथाभाऊ भडकले
Eknath Khadse VS Chandrakant Patil : भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवारांची साथ धरली. पुन्हा भाजपात जाणार म्हणून निघालेले खडसे पुन्हा राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे एकनाथ खडसेंचे राजकीय भविष्य कसे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अशातच जळगाव जिल्ह्यातील राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. मुक्ताईनगरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद पुन्हा सुरू झाला असून आता हे दोन्ही नेते एकमेकांच्या हमरीतुमरीवर आले आहेत.
चंद्रकांत पाटलांनी काय केला आरोप?
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे हे जनतेच्या विकासाचे राजकारण न करता कुटुंबाच्या स्वार्थाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. एकनाथ खडसे हे रंग बदलणारे सरपटणारे प्राणी आहेत. आपण आमदार झाल्याचे त्यांना सहन होत नसल्याने आणि वयामुळे ते भ्रमिष्ट झाले आहेत म्हणून ते काहीही बोलतात आणि वागतात. त्यांना आपण फारसे गंभीरतेने घेत नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

खडसे म्हणाले- अरे पाटील तू नेमका कोणाचा
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपावर एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले. चंद्रकांत पाटील हे खोकेबाज आमदार असल्याचा आरोप केला आहे. तसेच एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका करताना एकेरी भाषेचा उल्लेख केला त्यांनी म्हटलंय की, चंद्रकांत पाटलांना नीतिमत्ता आहे का? तुझी नियत आहे का? राष्ट्रवादीच्या बळावर निवडून आला त्यांना टांग मारून परत म्हणतो मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आहे. आता म्हणतोय मी शिंदे साहेबांचा आहे. नेमका तू कोणाचा आहे? सरड्यासारखा रंग कोण बदलत आहे? तू बदलतोय का मी बदलतोय? मी तर अजून कुठल्याच पक्षात गेलेलो नाही, अशी पलटवार एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलाय.
आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा
बोडवड उपसा जलसिंचन योजनेबाबतदेखील दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करताना पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसे परिवारात आमना-सामना होण्याची शक्यता निर्माण झाल्याने या दोन्ही नेत्यांमधील आरोप प्रत्यारोप कलगीतुरा आतापासूनच रंगल्याचे दिसून येत आहे.
30 वर्षांपासून दोन्ही नेत्यांमध्ये वाद
गेल्या तीस वर्षापासून एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये राजकीय वैमनस्य असल्याचं मुक्ताईनगरमध्ये पाहायला मिळाले आहे. त्यामुळं हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षासोबत राहणार असल्याचे विधान केल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर पुन्हा निशाणा साधला.
-
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा










Click it and Unblock the Notifications