Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वीज दर कमी करणं अन् लाडक्या बहि‍णींसाठी 20 लाख घरं देणं! 'हे' आहे देवेंद्र फडणवीसांचे पुढचे टार्गेट

Devendra Fadnavis Target : लोकसभेचे फेक नर्रेटिव्ह ब्रेक करून विधानसभेत आम्ही विक्रमी विजय मिळवू शकलो. हा ऐतिहासिक असा विजय होता. इतका चांगला कल मिळाल्यामुळे आमची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे, नदीजोड प्रकल्प, स्टील सीटी, लाडक्या बहि‍णींसाठी 20 लाख घरे देण्याचा आणि वीज दरात कपात करणे हे आपले टार्गेट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

नागपूर प्रेस क्लबतर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांचा आज सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत काही ध्येयांची माहिती दिली.

Devendra Fadnavis Target

जनतेच्या मनातील कामे करणार

देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभेचे फेक नर्रेटिव्ह ब्रेक करून विधानसभेत आम्ही विक्रमी विजय मिळवू शकलो. हा ऐतिहासिक असा विजय होता. इतका चांगला कल मिळाल्यामुळे आमची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नागपूरच्या प्रेस क्लब तर्फे आज त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कुठलाही जनमत जनतेच्या अपेक्षा घेऊन येतं. जनतेच्या मनातली कामे झाली पाहिजे हा प्रयत्न आम्ही करणार आहोत असं ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या सरकारमधील 12 मंत्र्यांना का ठेवले बाहेर? वाचा प्रमुख कारणे

विदर्भात सिंचन प्रकल्प, विजेचे दर कमी होण्यासाठी प्रयत्न

देवेंद्र फडणवीस म्हणाले, विदर्भासह महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर अन्याय आपण होऊ दिला नाही. मागच्या कार्यकाळात विदर्भात सिंचनाचे 80 प्रकल्प पूर्ण केले, अनेक प्रकल्प पूर्णत्वापर्यंत आणले ,याशिवाय पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्राचे प्रकल्प देखील पूर्ण केले. ऊर्जा विभागाचा मंत्री असल्याने, पुढच्या पंचवीस वर्षाचा रोड मॅप तयार असल्याचा उल्लेख त्यांनी केला. पुढच्या दोन वर्षात उद्योगासहित सर्वच प्रकारच्या विजेचे दर आपण कमी करू शकू अशा प्रकारची व्यवस्था तयार करण्याकडे भर आहे अशी माहिती त्यांनी दिली.

उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकत्र! आता तरी वितुष्ट संपतील का? वाचा दोघे एकमेकांना कुठे कधी भेटले?

वीज दरात कपात करणार

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सहा नदीजोड प्रकल्पांची काम आपण हातात घेतली आहे. ही सहा नदीजोड प्रकल्पांची काम महाराष्ट्राचा ट्रान्सफॉर्मेशन करणारी आहे. विदर्भातल्या सात जिल्ह्यांना पूर्णपणे कायापालट करू शकेल. तसेच गडचिरोली ही भारतातली पुढची स्टील सिटी होणार आहे असा विश्वास व्यक्त करत पुढच्या काळात नक्षलवादा विरोधात निकराची लढाई होईल असे त्यानी सांगितले. गडचिरोली क्षेत्र हे बदलण्याचं काम मोठ्या प्रमाणात आपण करणार आहे. विदर्भात औद्योगिक इकोसिस्टीम उभे राहते आहे असे देखील तिन्ही सांगितले.

लाडक्या बहि‍णींसाठी 20 लाख घरे

नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही ध्येय आहेत, त्यात एका वर्षात वीस लाख घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देण्यात येत असून हा रेकॉर्ड होत आहे तर ही घरे लाडक्या बहि‍णींना ते देणार आहेत. यासह लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा करणे सुरू केला असुन एकूणच केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राला गतीने पुढे नेण्याचा प्रयत्न आहे असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीसांची महत्वाची वक्तव्य

  • प्रत्येक खात्यासाठी शंभर दिवसांचे टार्गेट ठेवलेले आहे. आगामी 100 दिवसात कोणती कामे केलीत त्या 100 दिवसांचा रिपोर्ट सादर करू.
  • मी कुठेही पत्रकार परिषद न करता पहिली पत्रकार परिषद घेत आहे कारण नागपूर घर आहे.
  • या विधानसभा निवडणुकीत आपली आम्हाला मोठी मदत मिळाली.
  • लोकसभेत फेक नेरेटिव्ह सेट केलं त्यास आम्ही उत्तर देऊ शकलो.
  • मोठ बहुमत जनतेनी आम्हाला दिला त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे.
  • कोणतही बहुमत जनतेच्या अपेक्षा घेऊन येत असतात.
  • अनेकदा अडचणी आणि मर्यादा असतात या सर्वावर मात करुन आपल्या मनातील महारष्ट्र घडवायचं आहे.
  • 2014 मध्ये आपल सरकार आल्यावर हा नवखा आहे याला काय जमणार असे म्हटले गेले.
  • सतत विदर्भावर बोलणारा हा व्यक्ती पश्चीम महाराष्ट्रावर अन्याय करेल का? पण विदर्भासह इतर कुठेही आपणं अन्याय होऊ दिला नाही.
  • ऊर्जा विभागात पुढील पंचवीस वर्षाचा रोड मॅप आपण तयार केली.
  • एरिगेशनमध्ये सहा जोड प्रकल्पाची काम हाती घेतली आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+