मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत विरोध; डाव्या संघटना आक्रमक, नेमकं काय घडलं JNU विद्यापीठात!
Devendra Fadnavis opposed by SFI in JNU Delhi : दिल्लीतील प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) कुसुमाग्रज मराठी सामरिक अध्ययन केंद्राचे आज, गुरुवार, २४ जुलै २०२५ रोजी उद्घाटन झाले.
या महत्त्वाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिन्ही प्रमुख नेत्यांना निमंत्रण होते. त्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेएनयूमध्ये दाखल झाले.
त्यावेळी जेएनयूमध्ये देवेंद्र फडणवीस यांना जोरदार विरोध झाला. फडणवीस गो बॅक, अशा घोषणा विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या. विद्यापीठातील डाव्या संघटना आक्रमक झाल्या, त्यावेळी मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. आंदोलनाचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत.

फडणवीसांचे आगमन, नेमकं काय घडलं!
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, जेएनयूच्या आवारात काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या उपस्थितीला विरोध दर्शवला. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने (SFI) या विरोधात आंदोलन केले.
आंदोलकांपैकी एका विद्यार्थ्याने म्हटले की, "देशाच्या कोणत्याही भागात जाणे हा आमचा संविधानिक अधिकार आहे. महाराष्ट्रात गेल्यावर आम्हाला मराठी बोलण्याचा हट्ट करणं चुकीचं आहे." विविध आंदोलकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जेएनयूमध्ये विद्यार्थ्याची नारेबाजी
— Prathmesh Telang (@Prathmesh9579) July 24, 2025
मराठी अध्यासन केंद्राच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आज जेएनयूमध्ये आहेत #JNU #Devendrafadnavis pic.twitter.com/Diei5R6dXS
काही आंदोलकांनी हिंदी भाषेला कशाप्रकारे सर्वांवर थोपवले जात आहे, यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तर काहींनी महाराष्ट्रात अमराठी लोकांना मारहाण होते, असा आरोप करत फडणवीसांना विरोध केला. हा विरोध, महाराष्ट्रातील सध्याच्या त्रिभाषा सूत्राच्या वादाची आणि हिंदी विरुद्ध मराठी भाषेच्या संघर्षाची दिल्लीतील किनार स्पष्ट करतो.
17 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली
जेएनयूमध्ये मराठी भाषेसाठी स्वतंत्र अभ्यास केंद्र तयार करण्याचा प्रस्ताव सुमारे १७ वर्षांपूर्वी मांडण्यात आला होता. मात्र, तो केवळ कागदपत्रांपुरताच मर्यादित राहिला होता आणि प्रत्यक्षात साकारला नव्हता. यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांना "आपल्या मराठीला इथे स्थान का नाही?" असा प्रश्न अनेक वर्षांपासून सतावत होता. अखेर आज, या केंद्राचे उद्घाटन झाले, ज्यामुळे मराठी भाषेला राष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वाचे व्यासपीठ मिळाले आहे. मात्र, या उद्घाटनाच्याच वेळी काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गोंधळ घालून वातावरण तापवले.
VIDEO | Delhi: Maharashtra CM Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) addresses the foundation stone laying ceremony for the Shivaji Maharaj Strategic Study Centre at JNU.
— Press Trust of India (@PTI_News) July 24, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/pMpQlhOmZb
राज्यातील भाषावादाचे पडसाद दिल्लीत
महाराष्ट्रामध्ये सध्या सरकारकडून त्रिभाषा सूत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु विरोधकांकडून त्याला तीव्र विरोध होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "हिंदी भाषा इयत्ता पहिलीपासून सक्ती करू देणार नाही," अशी भूमिका घेतली आहे. यामुळे राज्यात 'हिंदी विरुद्ध मराठी' असा वाद निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात मराठी अध्ययन केंद्र सुरू होणे, ही एक महत्त्वाची आणि काही प्रमाणात विरोधाभासी घटना ठरली आहे.
-
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
लिव्ह-इन, लॅविश लाईफ आणि ३५० कोटींची माया; 'मेजर इक्बाल' अर्जुनचा पडद्यामागचा शाही थाट -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?





Click it and Unblock the Notifications