Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुख्यमंत्री ठरला..! देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

New Chief Minister Devendra Fadnavis- विधानसभेतील घवघवीत यशानंतर अखेर मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल झाल्याची माहिती आहे. शिवसेना शिंदे गट हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावासाठी आग्रही होता. मात्र अखेर वाटाघाटीनंतर फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. अनेक वृत्तवाहिन्यांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

Devendra Fadnavis has been confirmed as the new Chief Minister

फडणवीसांना तिसऱ्यांदा संधी

यापूर्वी २०१४ ते २०१९ या पंचवार्षीकमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सलग पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळले होते. त्यानंतर २०१९ मध्ये सत्तासंघर्षातही त्यांनी अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र ते सरकार औटघटकेचे ठरले. त्यानंतर आता पुन्हा २०२४ मध्ये ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री होण्याची ही तिसरी वेळ ठरणार आहे.

राज्यात २० मंत्री घेणार शपथ

मिळालेल्या माहितीनुसार नव्या मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे १०, शिंदे गटाचे सहा तर अजित पवार गटाचे ४ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या निवडणुकीत भाजप सर्वाधिक १३२ जागा जिंकत राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्याखालोखाल शिंदे गटाने ५७ तर अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, तेच सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+