मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठ वक्तव्य! खरी शिवसेना कुणाची? हेही सांगितलं
Devendra Fadnavis' big statement : मुख्यमंत्रीपद हे कुठल्याही निकषावर नाही तर तिन्ही पक्ष एकत्रित बसून हा निर्णय घेतील. आमच्यात कोणताही वाद नाही. पहिल्या दिवसांपासून हे निश्चित आहे की, तीन पक्ष मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील हे स्पष्ट आहे वरिष्ठ पातळीवरही हेच ठरले आहे. सर्वानुमते जो निर्णय होईल हेच मानले जाईल.
सर्व ताकदीने फेक नरेटीव्हला संपवलं. ज्यांनी संपवलं त्यांचे मी आभार मानतो. महाराष्ट्रात धर्मात आणि जातीत फुट पाडण्याचे प्रयत्न फोल ठरले आहेत. महाराष्ट्रात संतपरंपरा आहे. त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाले. त्यांनी गावागावात जाऊन एक राहा असा संदेश दिला. अजित पवार, रामदास आठवले, एकनाथ शिंदेंसह छोट्या छोट्या पार्टीचा हा विजय आहे. हा महायुतीचा विजय आहे. पंतप्रधानांचे आभार मी मानतो.

फडणवीस म्हणाले, कार्यकर्त्यांना अमित शहा यांनी महाराष्ट्रात येत प्रेरणा दिली. आमच्या नेत्यांनी केवळ भाजपच नाही तर सर्व २८८ जागांवर काम केले त्यामुळे हा विजयही साकार झाला. आम्ही चक्रव्युव्ह भेदले आहे. कुठल्याही लोकशाहीत एक चांगला पक्ष असावा. आम्ही विरोधी पक्षाचा सन्मान करु त्यांचे काय असेल ते ऐकू.
फडणवीस म्हणाले, झारखंडमध्ये जर झामुमो जिंकला तर ओक्के पण जर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा पराभव झाला तर इव्हीएम घोटाळा असा आरोप केला जातो हे योग्य नाही. लोकशाहीत कुणाला जनता डोक्यावर घेईल आणि कुणाला जनता आदळेल हे सांगता येत नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद हे कुठल्याही निकषावर नाही तर तिन्ही पक्ष एकत्रित बसून हा निर्णय घेतील. आमच्यात कोणताही वाद नाही. पहिल्या दिवसांपासून हे निश्चित आहे की, तीन पक्ष मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील हे स्पष्ट आहे वरिष्ठ पातळीवरही हेच ठरले आहे. सर्वानुमते जो निर्णय होईल हेच मानले जाईल.
लाडक्या बहिणींचे मानले आभार
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे जनतेचे आणि लाडक्या बहीणीचे मानले आभार मानले, महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. हा महायुतीच्या लाखो कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. संपुर्ण महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे असेही फडणवीस म्हणाले.
खरी शिवसेना एकनाथ शिंदें यांचीच
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीने ठरवून आम्हाला टार्गेट केले पण हळूहळू लोकांनाही हे लक्षात आले. आमचा ट्रॅक रेकाॅर्ड पाहून आम्हाला मतदान केले आहे. या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली की, बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना ही एकनाथ शिंदेची असलेलीच शिवसेना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही अजित पवार यांचाच आहे. मी आईचा आशीर्वाद केला आहे.
ओबीसी, मराठा समाज आमच्यासोबत
भाजपसोबत सर्वच समाज आहे. ओबीसी मराठा हे आहेतच कारण मराठा समाजाने मत दिले आहेत हे मताधिक्यच सांगते. त्यामुळेच आम्ही जिंकू शकलो. मी भाजपचा साधा कार्यकर्ता आहे. मी चाणक्य नाही. हा भाजपचा विजय आहे, देवेंद्र फडणवीस यांचे यात माझे साधे काम आहे.












Click it and Unblock the Notifications