शरद पवार फक्त मी जातीयवादी नाही असे सांगतात, ते कसे सर्वांना माहित; भाजप नेत्याचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 : शरद पवार हे सांगताना मी जातीयवादी नाही असे सांगतात. पण ते काय आहेत हे लोकांना चांगल माहिती आहे, असा हल्लाबोल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते नागपूरात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार जातीयवादी नाही असे सांगत असतात. त्यावर मला अधिक काही बोलायचे नाही. त्यांनी ज्या नोमाणींचा पाठिंबा घेतला आहे, 17 मागण्या मान्य केल्या. त्या नोमाणींनी सांगितले की व्होट जिहाद होगा, तर शरद पवार अजीम सिपाही है असे म्हटल्याचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

नीतेश राणेंची केली पाठराखण
नीतेश राणे यांच्या वादग्रस्त विधानावरुन फडणवीस यांना प्रश्न विचारला गेला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, आमदार नीतेश राणे हे नव्या रक्ताचे हिंदुत्ववादी आक्रमक नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. विधानसभेतील त्यांची भाषणे अभ्यासपूर्वक आहेत. संपूर्ण राज्यात हिंदू जागरणाचे त्यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कणकवली म्हणजे राणे कुटुंबियांचा बालेकिल्ला. आमदार नीतेश राणे हे कणकवली विधानसभेतून निवडून येणारच, असा विश्वास भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
..मग भाजप सपोर्ट मुस्लिमांवर बहिष्काराची धमकी
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात व्होट जिहादच्या दृष्टीने काही लोक काम करत आहेत. लोकसभेत भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, त्यांचे दाणापाणी बंद करा, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घाला, असे सज्जाद नोमाणी यांनी आवाहन केलेल आहे.
मविआकडून मुस्लिम मतांचे धुव्रीकरण
फडणवीस म्हणाले की, मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करून कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची असे मविआने ठरवले आहे. व्होट जिहादचे सिपाह सालार राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले असल्याचे मौलाना नोमाणींनी मतदानाचे आवाहन करणाऱ्या व्हिडिओत सांगितले आहे, मग हा व्होट जिहाद नाही का?, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
शरद पवारांनी काय लगावला होता टोला?
शरद पवार म्हणाले की, सत्ताधारी ज्या अर्थी व्होट जिहादचा विषय पुढे करत आहेत. याचा अर्थ आपल्याला यश मिळणार नाही, अशी खात्री त्यांना झाली आहे. म्हणूनच ते असा विषय बाहेर काढत आहेत. त्या समाजाची आम्हाला सवय झाली. पुण्यातील काही मतदारसंघांत विशिष्ट समाज भाजपलाच मतदान करतो. त्या समाजाची आम्हाला सवय झालीय. व्होट जिहाद हा शब्द वापरून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी एक प्रकारे या निवडणुकीला धार्मिक रंग देत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता.












Click it and Unblock the Notifications