Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बडतर्फ IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढल्या! जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला!

Delhi High Court denies anticipatory bail to Pooja Khedkar : बडतर्फ IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुजा खेडकर यांच्या अडचणी वाढतानाच दिसून येत आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता पुजा खेडकर यांचे पुढचे पाऊल काय हे बघावे लागणार आहे.

Delhi High Court denies anticipatory bail to Pooja Khedkar

काय म्हणाले हायकोर्ट?

दिल्ली उच्च न्यायालयाने माजी आयएएस प्रोबेशनर पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज स्वीकारण्यास नकार देताना सांगितले की, यूपीएससी ही प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते. पुजा खेडकर यांच्याशी संबंधित गोष्ट केवळ संस्थेविरुद्धच नव्हे तर समाजाविरुद्धही फसवणूक दर्शवते. या कटाचा उलगडा होण्यासाठी तपास आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईला अटक! शेतकऱ्यांना पिस्तुलने धमकावल्याचा आरोप

नाव, पत्ता बदलून परीक्षा

नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये पूजा खेडकर यांनी अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे तपासात समोर आले आहे. युपीएससीने असेही म्हटले आहे की, पूजा खेडकर यांनी नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये तिचे नाव, पालकांचे नाव, फोटो, ईमेल आयडी, फोन नंबर आणि पत्ता बदलून तिची ओळख लपवली. बनावट कागदपत्रांचा वापर करून त्या तब्बल अकरा वेळा यूपीएससी परीक्षेला बसल्याचेही समोर आले आहे.

पूजा खेडकर यांना मोठा झटका! यूपीएससीने केली निवड रद्द, आता कोणतीही सरकारी परीक्षाही देता येणार नाही

नागरी सेवांमध्ये निवडीसाठी ओळख बदलून अपंगत्व प्रमाणपत्रात अनियमितता केल्याचा आरोप असलेल्या पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर प्रशिक्षणार्थी IAS त्या राहणार नाही असे म्हणत UPSC ने पूजा खेडकर यांची जुलै 2024 मध्ये निवड रद्द केली.

UPSC ने 2023 बॅचच्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर विरुद्ध नागरी सेवा परीक्षेत स्वःतची ओळख बदलून विहित मर्यादेपेक्षा जास्त वेळा उपस्थित राहिल्याबद्दल एफआयआर दाखल केला होता. दरम्यान, UPSC ने पूजा यांना नोटीस बजावली होती आणि त्यांची निवड रद्द करण्याबाबत उत्तर मागितले होते. यात यूपीएससीने म्हटले होते की, पूजा खेडकर यांच्याविरुद्धच्या तपासात त्यांनी त्यांचे नाव, पालकांचे नाव, स्वाक्षरी, फोटो, ईमेल आयडी, मोबाइल नंबर आणि पत्ता बदलून यूपीएससीची परीक्षा दिल्याचे आढळून आले. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पूजाविरुद्ध बनावटगिरी, फसवणूक, आयटी कायदा आणि अपंगत्व कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

मोठी बातमी : पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ, केंद्राची कारवाई, बोगस प्रमाणपत्र देणे भोवले

पूजा खेडकर यांच्या या तीन चुका

  • पूजा खेडकर यांनी त्यांचे नाव बदलून युपीएससी परीक्षा दिली. सन 2019-20 मध्ये, पूजा दिलीपराव खेडकर हे नाव होते, तर 2021-2022 मध्ये, नाव बदलून पूजा मनोरमा दिलीप खेडकर करण्यात आले. 2019-20 पर्यंत वडिलांच्या नाव दिलीप असे होते, ते 2021 मध्ये बदलून दीप असे करण्यात आले.
  • पूजा यांच्याकडे 14 कोटींची संपत्ती आहे. तर त्यांनी आठ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न दाखवून ओबीसी नॉन क्रीमी लेयरचा लाभ घेतला.
  • पूजा खेडकर फक्त 7 टक्के अपंग आहेत. एका दिवसात पुरावा मिळणे संशयास्पद आहे. प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात होते.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+