Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईला अटक! शेतकऱ्यांना पिस्तुलने धमकावल्याचा आरोप

पुणे - युपीएससी निवडीवरून आधीच वादात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी हिंगोली जिल्ह्यातील नहाड येथून अटक केली आहे. पिस्तूल दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

व्हिडिओ झाला होता व्हायरल

मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्या पिस्टल रोखून शेतकऱ्यांना धमकावताना दिसत होत्या. पुण्यातील मुळशी तालुक्यातील धडवली गावात ही घटना घडली होती. पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी जमीन खरेदी केली होती. त्यासंदर्भात हे प्रकरण आहे.

Pooja Khedkar s mother Manorama Khedkar arrested

13 जुलैला गुन्हा दाखल

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 13 जुलै रोजी पौड पोलिस ठाण्यात पूजा खेडकर यांची आई मनोरमा आणि वडील दिलीप यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एफआयआरमध्ये शस्त्रास्त्र कायद्याच्या आरोपांचाही समावेश करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजाचे आई-वडील फरार झाले. पोलिसांनी 15 जुलै रोजी सांगितले होते की, दोघांनीही त्यांचे फोन बंद केले होते.

धाक दाखवून जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न

खेडकर कुटुंबीयांनी बाऊन्सरच्या मदतीने शेजारील शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना धमकावले, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. मनोरमा बळजबरीने त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा शेतकरी कुलदीप पासलकर यांनी केला. मात्र, पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी 12 जुलै रोजी ही घटना गेल्या वर्षी 5 जून रोजी धडवली गावात घडल्याचे सांगितले होते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली, मात्र तक्रारीत पिस्तुलाचा उल्लेख नव्हता.

शेतकऱ्यांनी जमीनी ताब्यात घेतल्याचा दावा

खेडकर कुटुंबीयांनी पुण्यातील मुळशी तालुक्यात 25 एकर जमीन खरेदी केली होती. मात्र, त्यातील काही भाग शेतकऱ्यांनी ताब्यात घेतल्याचा दावा खेडकर कुटुंबियांनी केला. त्यामुळेच मनोरमा आपल्या सुरक्षा रक्षकांसह तेथे पोहोचल्या आणि शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला होता. सुत्रांनी सांगितले की, मनोरमा खेडकर यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना आहे की नाही याचा तपास करत आहोत.

पूजा खेडकर यांची चौकशी सुरू

11 जुलै रोजी केंद्रीय कार्मिक मंत्रालयाच्या समितीने पूजावरील ओबीसी आणि अपंगत्व कोट्याच्या गैरवापराची चौकशी करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, समितीने पूजा खेडकर यांनी दाखल केलेल्या ओबीसी नॉन क्रिमिलेअर लेअर आणि अपंगत्वाचे प्रमाणपत्र मागवले आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी आणि नाशिकचे विभागीय आयुक्त हे दोघेही प्रमाणपत्र आणि त्यांचा अहवाल सादर करतील. त्याचबरोबर वैयक्तिक ऑडी कारवर लाल-निळे दिवे लावण्यासह इतर आरोपांबाबत आरटीओ आणि पोलिसांकडून अहवाल मागवण्यात आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+