Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी : पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ, केंद्राची कारवाई, बोगस प्रमाणपत्र देणे भोवले

Pooja Khedkar : बोगस प्रमाणपत्र जमा करून आयएएस झालेल्या वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरवर आता यूपीएससी पाठोपाठ केंद्राने देखील मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकरला आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पूजाने आयएएस पदासाठी जमा केलेली कागदपत्रं खोटी असल्याचं समोर आले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी देखील चालू आहे. तत्पूर्वी युपीएससीच्या वतीने बर्डतर्फची कारवाई करण्यात आली.

26 सप्टेंबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर

पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकारच्या बडतर्फीच्या निर्णयामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणी माहिती अधिकारी विजय कुंभार यांनी ट्विटद्वारे माहिती दिली. ते म्हणाले की, एकदा आयएएस झालं की देशाचे पंतप्रधानदेखील आपल्याला सेवेतून काढू शकत नाहीत या अविर्भावात वागणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ही चपराक असेल. पूजा खेडकरप्रमाणेच अनेकांनी खोटी कागदपत्रं सादर करून पदं घेतली आहेत. त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे.

Pooja Khedkar

नेमकं प्रकरण काय?

पूजा दिलीप खेडकर 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिने 841 वा क्रमांक पटकावला होता. काही महिन्यापूर्वी सहायक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुणे जिल्ह्यात तिची नियुक्ती करण्यात झाली होती. पण, प्रशिक्षणाच्या काळातच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडं अवास्तव मागण्या केल्यामुळं आणि अरेरावी वर्तनामुळं तिच्याबाबत प्रचंड चर्चा झाली. त्यानंतर तिथून वाशिम या ठिकाणी बदली करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा युपीएससीने प्रशिक्षण केंद्रात बोलावून घेतले होते.

पूजा खेडकरने दृष्टिदोष प्रवर्गातून UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि मानसिक आजाराचे प्रमाणपत्र सादर केले. याच आधारावर तिला विशेष सवलत मिळाली आणि ती आयएएस झाली. त्यानंतर तिला सहावेळा वैद्यकीय तपासणीसाठी बोलवण्यात आलं. पण प्रत्येक वेळी त्या अनुपस्थित राहिली. तसेच पूजा खेडकरने स्वतःच्या नावात, तिच्या वडिलांच्या नावात तसेच आईच्या नावात बदल करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचं या चौकशीत समोर आलं आहे. त्यानंतर ही कारवाई करणात आली.

पूजा म्हणाली होती- यूपीएससीला कारवाईचा अधिकार नाही

युपीएससीने 31 जुलै रोजी पूजाची निवड रद्द केली होती आणि तिला भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यास बंदी घातली होती. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर, UPSC ला पूजाला CSE-2022 नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले. आयोगाने दिल्ली पोलिसांकडेही गुन्हा दाखल केला होता.पूजाने 28 ऑगस्ट रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले होते की, यूपीएससीला तिच्यावर कारवाई करण्याचा अधिकार नाही. पूजा म्हणाली की UPSC ने 2019, 2021 आणि 2022 च्या व्यक्तिमत्व चाचण्यांदरम्यान गोळा केलेल्या बायोमेट्रिक डेटाद्वारे (डोके आणि बोटांचे ठसे) माझी ओळख सत्यापित केली आहे. माझ्या सर्व कागदपत्रांची आयोगाने 26 मे 2022 रोजी व्यक्तिमत्व चाचणीत पडताळणी केली.

मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा दिल्याचा आरोप

अपंग प्रवर्गातील उमेदवार 9 वेळा परीक्षेला बसू शकतो. सामान्य श्रेणीतून 6 प्रयत्नांना परवानगी आहे. पूजावर खोटे वय, आडनाव बदलणे, पालकांची चुकीची माहिती देणे, आरक्षणाचा फायदा चुकीच्या पद्धतीने घेणे आणि नागरी सेवा परीक्षा निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेळा दिल्याचा आरोप आहे. CSE-2022 मध्ये पूजाला 841 वा क्रमांक मिळाला आहे. 2023 बॅचची IAS प्रशिक्षणार्थी पूजा जून 2024 पासून पुण्यात प्रशिक्षण घेत होती.

मी 47 टक्के अपंग असल्याचा केला होता दावा

30 ऑगस्ट रोजी पूजाने दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर दाखल केले होते की UPSC परीक्षेत आरक्षणासाठी उमेदवाराचे 40% अपंगत्व असणे आवश्यक आहे. मी 47% अपंग आहे. त्यामुळे केवळ अपंग श्रेणीतील माझे प्रयत्न यूपीएससी परीक्षेत गणले जावेत. तिने सांगितले की, महाराष्ट्रातील हॉस्पिटलचे प्रमाणपत्र आहे, जे पुष्टी करते की त्यांना फाटलेल्या ACL (अँटेरियर क्रूसीएट लिगामेंट) आणि डाव्या गुडघ्यात अस्थिरता आहे. पूजाने सांगितले की तिने नागरी सेवा परीक्षेसाठी 12 प्रयत्न केले आहेत. त्यापैकी 7 प्रयत्न सर्वसाधारण प्रवर्गातून देण्यात आले आहेत. सर्वसाधारण श्रेणीतील सातही प्रयत्नांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पूजाने केले.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+