Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अजित पवारांच्या जवळच्या सहकाऱ्याचा हार्टअ‍टॅकने मृत्यू! 10 वर्षाचा सोबती गेला, दादांनी अतीव दु:ख

DCM Ajit Pawar's public relations officer Sanjay Deshmukh death : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे आज हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रशासन, राजकीय वर्तुळ तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

कायम सर्वांना मदत करणारे आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अर्थसंकल्पीय अधिवेशनासारख्या महत्त्वाच्या काळात सर्वात वेगवान बातम्या देण्यात त्यांचा हातखंडा होता. ते अत्यंत दिलदार, मदतगार, सर्वांशी मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी दुःख आणि भावना व्यक्त केल्या.

Sanjay Deshmukh death

संजय देशमुख यांच्या निधनाने आपली वैयक्तिक आणि सांघिकही खूप मोठी हानी झाली आहे.
सुसंवाद, सौम्यता आणि उत्तम कर्तव्यनिष्ठा हीच त्यांची खरी ओळख होती. शासन आणि जनतेतील दुवा म्हणून त्यांनी आपली भूमिका अत्यंत जबाबदारीने पार पाडली.

संजय देशमुख यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. "ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि शोकाकुल कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती प्रदान करो," अशा शब्दांत सहकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संजय देशमुख यांची मुलगी सध्या जर्मनीत असून, त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम उद्या सकाळी,शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे होणार आहे.

अजित पवारांची एक्सवर श्रद्धांजली

अजित पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी संजय देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली. अजित पवार म्हणाले, "मागील दहा वर्षांहून अधिक काळ माझे जनसंपर्क अधिकारी म्हणून उत्कृष्टपणे काम पाहणारे श्री. संजय देशमुख यांच्या आकस्मिक निधनानं अतीव दुःख झालं. त्यांच्या जाण्यानं समर्पक आणि सखोल लिखाण करणारा एक विश्वासू, अनुभवी सहकारी मी गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि माझे कुटुंबिय सहभागी आहोत."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+