Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अकोला 'पश्चिम' मध्ये काँग्रेसचा उमेदवार निश्चित, भाजपपुढे बालेकिल्ल्यात पेच! गड राखण्याचे आव्हान

Akola West Assembly Constituency : विधानसभा निवडणूक दोन महिन्यांत होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. यात आता भाजपचा बालेकिल्ला असलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पुन्हा विजय मिळवण्यासाठी पक्ष जोरकसपणे प्रयत्न करीत आहेत. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने भाजपपुढे उमेदवार निवडीचा पेच आहे.

दरम्यान, भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. पाच महिन्यांपूर्वी या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार होती. कॉंग्रेसने साजीद खान पठाण यांना उमेदवारी जाहीरही केली होती. पण, न्यायालयाने ही निवडणूक रद्द केली. त्यामुळे पाच महिन्यांपासून कॉंग्रेसचे खान तयारी करीत आहेत.

Akola West Assembly Constituency

या मतदारसंघाचे सलग 29 वर्षे भाजपचे गोवर्धन शर्मा यांनी नेतृत्व केले. दुर्दैवाने 10 महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यामुळे आता शर्मा यांचा सारखा तगडा उमेदवार भाजपला शोधावा लागणार आहे. पक्षाकडून इच्छुकांची संख्याही अधिक आहे. शर्मा यांनी तळागाळात पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करून अकोल्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व निर्माण केले.

कॉंग्रेसच्या सुवर्णकाळातही शर्मा यांनी हा बालेकिल्ला अबाधित ठेवला होता. सलग विजयाच्या दोन हॅट्ट्रिक करणाऱ्या शर्मा यांच्या पश्चात त्यांच्या सारखा दांडगा जनसंपर्क, मतदार संघातील समस्यांची जाण असणारा नेता अकोला जिल्ह्यात नाही. त्यामुळे गड राखण्यासाठ भाजपपुढे आव्हान आहे. मतदारसंघात सर्वधर्मीय मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जातीय समीकरणे येथे काम करीत नाहीत. शर्मा यांचा उत्तराधिकारी कोण असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Take a Poll

तब्बल 29 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी पक्ष नेतृत्वाला चांगलीच कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी असून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. महायुतीत हा मतदारसंघ भाजप तर महाविकास आघाडीत कॉंग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसकडून साजीद खान यांना उमेदवार म्हणून पुढे केले जात असून, त्यांच्याशिवाय दुसरा चेहरा नाही. वंचितने अजून पत्ते उघड केले नाहीत.

लोकसभेत कॉंग्रेसला आघाडी

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'अकोला पश्चिम'मध्ये काँग्रेसने 12 हजारांवर मतांची आघाडी घेतल्याने भाजपच्या चिंतेत वाढ झाली. तर कॉंग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे.

भाजपकडून दावेदार असे..

या मतदारसंघात गोवर्धन शर्मा यांचे पुत्र कृष्णा शर्मा इच्छुक आहेत. पक्ष त्यांना उमेदवारी देऊ शकतो. त्यांच्या शिवाय माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदानी, ॲड. मोतीसिंह मोहता, विजय अग्रवाल, गिरीश जोशी यांच्यासह २२ पेक्षा अधिक उमेदवार निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. सगळ्यांनी आतापासूनच नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी वरिष्ठांना कसरत करावी लागणार आहे.

संजय धोत्रे, गोवर्धन शर्मा यांची उणीव

अकोला जिल्ह्यात माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे आणि गोवर्धन शर्मा यांनी पक्ष संघटना वाढवली होती. दुर्दैवाने आता हे दोन्ही नेते दिवंगत झाले. त्यामुळे पक्षाला या निवडणुकीत त्यांची उणीव भासणार आहे.

गतवेळी निसटता विजय

विजयाची 'डबल हॅट्ट्रिक' साध्य करणाऱ्या शर्मा यांना 2019 मध्ये काँग्रेसचे साजीद खान यांनी
कडवी झुंज दिली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही भाजपची पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. खासदार अनुप धोत्रे यांच्यापेक्षा काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना 12 हजार 071 मते अधिक पडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. या मतदारसंघात वर्चस्व राखण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे गोवर्धन शर्मा लालाजी 73,262 मते मिळवून विजयी झाले होते.

काँग्रेसचे साजीद खान मन्नान खान यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर केवळ 2,593 मतांचे होते. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे गोवर्धन शर्मा 66,934 मते मिळवून विजयी झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजय‌ देशमुख यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर 39,953 मतांचे होते.

या आहेत समस्या

सलग 29 वर्ष या मतदारसंघात भाजपचा आमदार होता. पण, अजूनही अनेक अंतर्गत भागात रस्ते नाहीत. नियमित पाणीपुरवठा नाही. अकोला जिल्ह्यात मोठा प्रकल्प यावा, यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न केले जात नाहीत, अशा तक्रारी स्थानिक नागरिकांच्या आहेत. अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात 3 लाख 28 हजार 76 एवढे मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीसोबत या ठिकाणी विधानसभेची पोटनिवडणूक होणार होती. त्याकरिता 307 मतदान केंद्रांचे नियोजनही केले होते. पण, नंतर पोटनिवडणूक रद्द झाली. (Akola West Assembly Constituency)

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+