CM Fadnavis' big decision Government services on WhatsApp : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी शासकीय सेवा अधिक सोप्या आणि वेगवान करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 'आपले सरकार' पोर्टलच्या आढावा बैठकीत, आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही शासकीय सेवा पुरवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या या महत्वाकांक्षी निर्णयामुळे नागरिकांना घरबसल्या आणि एका क्लिकवर सरकारी सेवांचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
'आपले सरकार' आणि व्हॉट्सॲपची जोड
सध्या राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत एकूण १०१ सेवा पुरवल्या जातात, त्यापैकी ९९७ सेवा 'आपले सरकार' पोर्टलवर आधीच ऑनलाइन उपलब्ध आहेत. या सेवांचा लाभ अधिक सोप्या पद्धतीने मिळावा यासाठी व्हॉट्सॲपचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे, केवळ स्मार्टफोन असलेल्या सामान्य नागरिकांनाही सरकारी कामे करण्यासाठी मदत होईल.
नागरिकांसाठी शासकीय सेवा आता व्हॉट्सॲपवर!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'आपले सरकार' पोर्टलवरील आरटीएस अधिसूचित सेवांच्या स्थितीबाबत आढावा बैठक संपन्न झाली.
राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत नागरिकांना 1001 शासकीय सेवा पुरवण्याचे काम सुरू असून, 'आपले… pic.twitter.com/doxYedDBFi
या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि सेवा वेळेवर पोहोचण्यासाठी राज्याच्या प्रत्येक तालुक्यात 'रिंग व क्लस्टर प्रणाली' राबवली जाणार आहे. सुरुवातीला एका तालुक्यातील १० ते १२ गावांचा समावेश करून गरजेनुसार सेवा पुरवल्या जातील. यासाठी स्वतंत्र व्यवस्थापन गट तयार करण्यात येणार असून, सेवा अधिक सोयीस्कर करण्यासाठी 'डिश डिजिटल सेवा हब'चा वापर केला जाईल.
Take a Poll
सेवांमध्ये गुणवत्ता आणि एकसमानता
या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत, ते काय आणि त्याचे फायदे काय हेही जाणून घेऊया.
'हे' होणार फायदे...
सेवांचे एकत्रीकरण: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) एकाच प्रकारच्या ९ सेवांचे एकत्रीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ होईल.
अर्जावेळी कमी कागदपत्र: अर्ज करताना लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल.
डॅशबोर्डची एकसमानता: सर्व जिल्हा परिषद, महापालिका आणि विद्यापीठांचे डॅशबोर्ड एकसारखे करण्याचे निर्देश देण्यात आले, ज्यामुळे माहितीची उपलब्धता आणि व्यवस्थापनात सुसूत्रता येईल.
या निर्णयामुळे नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी होणारा त्रास कमी होईल आणि सरकारी कामांमध्ये पारदर्शकता व वेग येईल, अशी अपेक्षा आहे.
सरकार आणि जनता जवळ आणण्याचा प्रयत्न
सरकारी सेवा थेट व्हॉट्सॲपवर!या माध्यमातून प्रशासनाला नागरिकांच्या अधिक जवळ आणण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच, 'आपले सरकार' पोर्टलवरील सर्व सेवा व्हॉट्सॲपवर देखील उपलब्ध होणार आहेत.
गुणवत्ता तपासणी: सेवांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी नियमितपणे तृतीय-पक्ष पडताळणी (Third-Party Verification) केली जाईल.