बाळासाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्याचा आमचा प्रयत्न; मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन
Balasaheb Thackeray Memorial Day : बाळासाहेब ठाकरे यांच्या 12 व्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुलाब्यातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांची देखील उपस्थिती होती.
अभिवादन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यात सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. त्यांचा आदर्श विचार त्यांच्या मनातील महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार म्हणून आम्ही त्यांचा विचार घेऊन पुढे जात आहोत. गोरगरीबांच्या कल्याणासाठी आम्हाला काम करण्यासाठी संधी ही बाळासाहेबांमुळेच मिळाली.
#Live । 17-11-2024 📍कुलाबा, मुंबई
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 17, 2024
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन - लाईव्ह
https://t.co/sX0i84G9zv
शिंदे म्हणाले की, विकास आणि कल्याणकारी योजनांची आम्ही सांगड घालू शकतो. भविष्यातील कालावधी पुन्हा महायुती सरकारला मिळेल. विकासाचे विकेंद्रीकरण करण्याचे काम करेल. प्रत्येकाच्या जीवनात चांगले दिवस आणण्याचे आमचे स्वप्न आहे.
#Live l17-11-2024 📍मुंबई 🎥 पत्रकारांशी संवाद
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 17, 2024
https://t.co/Rvx0KvyXrp
पुढे बोलताना शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, मला आजच्या दिवशी कोणतेही राजकीय विधान करायचे नाही. अडीच वर्ष घरात बसून कामांना स्टे देणे हे त्यांना विकास म्हणता येईल का, स्थगित देणारे सरकार येथे राहिले असते तर महाराष्ट्र आणखी पंधरा ते वीस वर्ष मागे गेला असता. पण आम्ही महायुतीचे सरकार स्थापन करून महाराष्ट्राच्या विकासाला गती दिली.












Click it and Unblock the Notifications