संभाजीनगरमध्ये सापडलं घबाड, सोन्या-चांदीच्या दागिन्यांची 19 कोटींची गाडी पकडली
संभाजीनगर : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या आचारसंहितेच्या काळात छत्रपती संभाजीनगर- जळगाव रस्त्यावर पोलिस पथकाने मोठी कारवाई केली. गुरुवारी सायंकाळी सिल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर तब्बल 19 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले. ते जळगाव येथील एका नामांकीत ज्वेलर्सचे असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, हे दागीने पडताळणीसाठी जीएसटी विभागाकडे देण्यात आले आहे.

काय होतं पडकलेल्या गाडीत
संभाजीनगर-जळगाव रस्त्यावर निल्लोड फाट्याजवळ पोलिसांचा चेकपोस्ट आहे. तेथे वाहनांची तपासणी होती. गुरुवारी सायंकाळी एका गाडीत 19 कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले. हे दागिने जळगाव येथील एका नामांकित ज्वेलर्सचे असल्याची आहे. सदर सापडलेलं हे सोनं-चांदी जीएसटी विभागाच्या हवाले करण्यात आलं आहे. दागिने खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी संबंधितांना बोलवण्यात आलं आहे. तसेच याबाबतच्या सर्व कागदपत्रांचीही पडताळणी केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नेरुळमध्येही सापडलं घबाड
ठाणे पोलिसांनी नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर 16 येथील एका रो-हाऊसमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरात रोकड असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी रो-हाऊसवर छापा टाकला. त्यावेळी तेथे दोन कोटी 60 लाखांची रोकड सापडली. सुमारे अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून सदर कारवाई ही निवडणूक आयोगाने आणि ठाणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई केली असून कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केली आहे.












Click it and Unblock the Notifications