Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

चेंबूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध उबाठा; तुकाराम काटे फातर्पेकरांशी भिडणार

Shivsena vs shivsena in chembur : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर आणि उपनगरातील लढती अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या होणार आहेत अशी स्पष्ट चिन्ह दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या महाराष्ट्रभरातील आमदारांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला असला तरी मुंबई शहर आणि उपनगर मधील मोजके आमदार वगळता अन्य आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिलेले आहेत. अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मात्र एकनाथ शिंदे यांना साथ दिलेली आहे. शिवसेना विरुद्ध उबाठा शिवसेना अशा लढती विशेष लक्षवेधी ठरणार आहे. अशीच एक लढत चेंबूर विधानसभा मतदारसंघात होत आहे

येथे शिवसेनेचे तुकाराम काटे आणि उद्धव ठाकरे गटाचे प्रकाश फातर्पेकर यांच्यात लढत होत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश फातर्पेकर यांना चेंबूर विधानसभा मतदारसंघातून 53 हजार 264 मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरेंना यांना 34 हजार 246 मतं मिळाली होती. तसेच चेंबूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यांचे उमेदवार राजेंद्र माहुलकर यांना तब्बल 23,178 मतं मिळाली होती. चेंबूरमध्ये मनसेनं चौथ्या पसंतीची मतं मिळवली होती. मनसेचे उमेदवार कर्णबाळा डुबळे यांना 14,404 मतं मिळाली होती. चेंबूरमध्ये कोकणी मतदार मोठ्या प्रमाणात असला तरी दलित आणि उत्तर भारतीय मतंही निर्णायक ठरतात.

Maharashtra Assembly Election 2024

तुकाराम काटे माजी आमदार

तुकाराम काटे यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत चेंबूरच्या शेजारील मतदारसंघ असलेल्या अणुशक्ती विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे तिकिटावर विजय मिळवला होता. तेथे त्यांनी राष्ट्रवादीचे तगडे नेते नबाब मलिक यांचा पराभव केला होता. 2019 साली झालेल्या निवडणुकीत मलिक यांनी या पराभवाची परतफेड केली. आता अणुशक्ती नगर मतदारसंघातील दोन्ही माजी आमदार अन्य विधानसभा मतदारसंघात लढत आहेत. यात तुकाराम काटे हे चेंबूर विधानसभा मतदारसंघातून लढत असून नबाब मलिक यांनी मानखुर्द शिवाजीनगर मतदार संघ निवडला आहे.

राहुल शेवाळे यांची ताकद

चेंबूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांची मोठी ताकद आहे. त्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी खूप खल झाला आणि अखेरीस उमेदवारीची माळ तुकाराम काटे यांच्या गळ्यात घालण्यात आली. या मतदारसंघातून राहुल शेवाळे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा करण्यात येत होती मात्र ती फोल ठरली आणि तुकाराम काटे यांना संधी मिळाली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर काही काळ तुकाराम काटे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते मात्र काही कालावधीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणे पसंत केले. चेंबूर येथे असलेल्या आपल्या शाळेच्या विकासाचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिल्यामुळे आपण शिंदे यांच्यासोबत जात आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. तुकाराम काटे हे अणुशक्ती विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार असले तरी चेंबूर मतदारसंघातही त्यांचा बऱ्यापैकी संपर्क आहे. तळागाळातील शिवसैनिक म्हणून ते ओळखले जातात. काटे यांच्या रूपाने चेंबूर विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी तगडा मोहरा रिंगणात उतरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अशोक स्तंभाची उभारणी

चेंबूर विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी शिवसेनेने ही चांगलीच फिल्डींग लावली असून तेथे विविध विकास कामांची साखर पेरणी करून ठेवली आहे. या मतदारसंघात दलित मते निर्णायक आहेत. चेंबूर येथील आंबेडकर उद्याना समोरील अशोक स्तंभ सतरा वर्षाच्या प्रदीर्घ मागणीनंतर पूर्ण करण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यात अशोक स्तंभाच्या कामाला मुंबई महानगरपालिकेने गती दिली. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या सौंदर्यकरण कामाचे अंतर्गत या अशोक स्तंभाच्या कामाला गती देण्यात आली आहे. दादर येथील चैत्यभूमी नंतर दलित बांधवांसाठी चेंबूर येथील आंबेडकर उद्यान अधिक महत्त्वाचे आहे. या कामामुळे दलित बांधवांमध्ये समाधानाची भावना आहे.

काटे विजयाच्या दिशेने सरकणार ?

प्रभाग क्रमांक 152 मधील सिद्धार्थ कॉलनी येथील बुद्ध विहाराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तब्बल 25 हजार महिलांना चेंबूर विधानसभा मतदारसंघातून लाभ देण्यात आलेला आहे. मुंबई शहर सौंदर्यकरण अंतर्गत अन्य कामेही करण्यात आली असून विकासाच्या विविध कामांना एकनाथ शिंदे आणि जातीनिशी लक्ष घालून चालना दिली आहे. तुकाराम काटे यांच्या प्रचाराचा दणदणीत नारळ फुटला असून ते घरोघरी प्रचार करीत आहेत. मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनीही त्यांना चांगलेच पाठबळ दिल्याचे दिसून येत आहे. शिवाय राहुल शेवाळे यांची संपूर्ण रसद काटे यांच्या पाठीशी राहणार आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे अशा या संघर्षात चेंबूर विधानसभा मतदारसंघात शिंदेच बाजी मारणार असल्याचा विश्वास चेंबूर मधील शिवसैनिकांना वाटत आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+