भाजपच्या चौथ्या यादीत दोघांना उमेदवारी! वाचा राज्यात कोणता पक्ष किती जागावर निवडणूक लढवणार?
BJP's fourth list announced : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील सर्वात जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आघाडी घेतली आहे. आज भाजपची चौथी यादी जाहीर झाली आहे. या यादीत दोघांना स्थान देण्यात आले आहे. आता भाजप एकूण 148 जागांवर लढणार हे स्पष्ट झाले. महायुतीचे उमेदवार रिंगणात उतरवण्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना दुसऱ्या क्रमांकवर तर अजित पवारांची राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भाजपने आपल्या चौथ्या यादीत एकूण दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यासंदर्भात भाजपने एक्सवर यादी पोस्टही केली आहे.

यांना उमेदवारी
चौथ्या यादीत भाजपकडून उमरेड (अनुसुचित जमाती ) मतदारसंघातून सुधीर लक्ष्मणराव पारवे यांना उमेदवारी दिली आहे. मिरा भाईंदर मतदारसंघातून नरेंद्र लालचंदजी मेहता यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. यासह भाजप आता एकूण 148 जागांवर लढणार हे स्पष्ट झाले आहे. सुत्रांनी सांगितले की, ही भाजपची अखेरची यादी आहे.
हेही वाचा : धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भाजप देणार हादरे! कुणाल पाटील यांना तगडे आव्हान
महायुती - 7 जागांवर आणखी उमेदवार जाहीर करणार
- महायुतीने आतापर्यंत 288 पैकी 281 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
- भाजप - 148
- शिवसेना - 78
- राष्ट्रवादी (अजित पवार) - 49
- इतर मित्र पक्ष 6 जागांवर निवडणूक लढवत आहेत.
यामध्ये रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कलिनामधून, युवा स्वाभिमान पक्ष बडनेरामधून, राष्ट्रीय समाज पक्ष गंगाखेडमधून आणि जनसुराज्य शक्ती पक्षाकडून शाहूवाडीतून, जनसुराज्य पक्षाकडून हातकणंगलेतून आणि राजश्री शाहूविका शिरोळ येथून उमेदवार उभे करणार आहेत. महायुतीने अजून 7 जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
महाविकास आघाडी
- महाविकास आघाडीने आतापर्यंत 265 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
- काँग्रेस - 102
- शिवसेना (उद्धव ठाकरे) - 84
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 82
- महाविकास आघाडीत अजून 21 जागांसाठी उमेदवार जाहीर करायचे आहे.
नागपुरच्या जागेवर अनिल देशमुखांऐवजी पूत्र लढणार
नागपूरच्या काटोल जागेवर शरद गटाने उमेदवार बदलला आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना यापूर्वी येथून तिकीट मिळाले होते, मात्र शरद गटाने त्यांचे नाव काढून त्यांचे पुत्र सलील देशमुख यांना काटोलमधून उमेदवारी दिली.
हेही वाचा : भाजप ठरला सर्वात जास्त उमेदवार देणारा अन् नावं जाहीर करणारा पक्ष! वाचा 121 उमेदवारांची यादी क्लिकवर












Click it and Unblock the Notifications