धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भाजप देणार हादरे! कुणाल पाटील यांना तगडे आव्हान
Dhule Rural Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत भाजपची पहिली यादी आली. यामध्ये धुळे ग्रामीण मतदारसंघाचा समावेश नाही. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्यावर माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या निधनानंतरही त्यांच्या घराण्याचा दबदबा कायम आहे.
रोहीदास पाटील यांच्या निधनानंतर गेल्या दोन निवडणुकीत त्यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार कुणाल पाटील यांनी या मतदारसंघात विजय मिळवला. यावेळीही काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी निश्चित आहे. मात्र, त्यांच्या समोर भाजपकडून मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाकडून राम भदाणे किंवा बाळासाहेब भदाणे यांच्यापैकी एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे याही वेळी काँग्रेस-भाजप लढत पाहायला मिळणार आहे.

भाजपकडून भदाणे; पण कोणते?
धुळे ग्रामीण मतदारसंघात भाजपकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे. यावेळी भाजपने जोरदार तयारी केली आहे. मात्र, उमेदवाराबाबत अजूनही अनिश्चितता आहे. राम भदाणे जे नगावचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, तसेच बाळासाहेब भदाणे जे बोरकुंडचे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांची उमेदवारीच्या दृष्टीने नावे पुढे येत आहेत.
2019 च्या निवडणुकीत भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे यांनी काँग्रेसच्या कुणाल पाटील यांना कडवे आव्हान दिले होते. मात्र, त्या पराभूत झाल्या. याच मतदारसंघात 2014 मध्ये मनोहर भदाणे यांनी देखील अयशस्वी लढत दिली होती. याहीवेळी भाजपकडून भदाणे उमेदवार असू शकतात. पण, ते नेमके कोणते भदाणे असतील हे अद्याप निश्चित नाही.
हिलाल माळी काय भूमिका घेणार?
हिलाल माळी हे या निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडेही राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. ते जर अपक्ष मैदानात उतरले तर लढत तिरंगी होऊ शकणार आहे.
या आहेत समस्या
विद्यमान आमदार पाटील यांनी बरीच विकास कामे केली आहेत. परंतु, धुळे ग्रामीण मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक बंद पडलेले किंवा अद्याप सुरूच न झालेले प्रकल्प हे स्थानिक जनतेच्या असंतोषाचे मुख्य कारण आहे. बेरोजगारी हा देखील एक मोठा मुद्दा आहे. सुलवाडे-जामफळ व अक्कलपाडा प्रकल्पाचे पाणी शेतांपर्यंत पोहोचवणे ही देखील प्रमुख समस्या आहे.
2019 निवडणुकीतील निकाल
सन 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे कुणाल पाटील यांनी भाजपच्या माईसाहेब ज्ञानज्योती पाटील यांचा 14,564 मतांनी पराभव केला होता. या निकालाने धुळे ग्रामीण काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध झाले होते.

या निवडणुकीतील परिस्थिती
धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचा बालेकिल्ला कायम ठेवण्याचे आव्हान विद्यमान आमदार कुणाल पाटील यांच्यासमोर आहे, तर भाजपकडून हा गड सर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, जर राम भदाणे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली, तर पुन्हा एकदा दोन राजकीय घराण्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळेल. या निवडणुकीत स्थानिक प्रश्न महत्त्वाच्या भूमिका निभावतील, ज्यामुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता! -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?








Click it and Unblock the Notifications