Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भाजप ठरला सर्वात जास्त उमेदवार देणारा अन् नावं जाहीर करणारा पक्ष! वाचा 121 उमेदवारांची यादी क्लिकवर

BJP 121 candidates List in one click : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जिंकण्याचे भाजपने डावपेच आखले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनितीनुसार भाजप काम करत आहे. जिंकण्यासाठी भाजप प्रत्येक गोष्ट विचारपुर्वक करत असून भाजपकडून निवडणुकीसाठी दुसरी यादीही जाहीर झाली आहे. यासह भाजप आता सर्वात जास्त उमेदवार देणारा अन् नावं जाहीर करणारा पक्ष ठरला आहे.

भाजपने कालच दुसरी बावीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. याआधी 99 आणि आता 22 म्हणजेच 121 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. या सर्व उमेदवारांची यादी या बातमीत दिली आहे.

BJP 121 candidates List in one click

देवयानी फरांदेंना नाशिक मध्यचं तिकीट

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आलीयं. या यादीत एकूण 22 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत 99 उमेदवारांचा समावेश होता. दोन्ही याद्या मिळून भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत 121 उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपच्या गोपीचंद पडळकरांना जत मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीयं. यासह नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघावरून मोठी रस्सीखेच चालू होती, त्यावर भाजपाने तोडगा काढला आहे. पक्षाने देवयानी फरांदे यांना नाशिक मध्य या मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट दिलयं.

आतापर्यंत सर्वाधिक भाजपकडूनच उमेदवार जाहीर

राज्यात आतापर्यंत सर्वाधिक भाजपनेच आपले उमेदवार जाहीर केले आहे. त्याखालोखाल काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जास्त उमेदवार जाहीर करण्यात क्रम लागतो. याआधी भाजपाने 99 उमेदवार जाहीर केले होते. यामध्ये भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली तर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली आहे. खासकरुन चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड, तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कुलाबा मतदारसंघातून संधी देण्यात आलेलीच आहे.आता दुसऱ्या यादीत कोणते 22 उमेदवार आहेत हे पाहुया.

पहिली यादी, विदर्भातील कोण -कोण

कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर पश्चिम - देवेंद्र फडणवीस
नागपूर दक्षिण - मोहन मते
नागपूर पूर्व - कृष्ण खोपडे
चिखली -श्वेता महाले
खामगाव - आकाश फुंडकर
अकोला पूर्व - रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे - प्रताप अडसद
अचलपूर - प्रवीण तायडे
हिंगणघाट - समीर कुणावार
वर्धा - पंकज भोयर
हिंगना - समीर मेघे
तिरोरा - विजय रहांगडाले
गोंदिया - विनोद अग्रवाल
बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार
चिमूर - बंटी भांगडिया
वाणी - संजीवरेड्डी बोडकुरवार
रालेगाव - अशोक उडके
यवतमाळ - मदन येरवर

महाराष्ट्रातील उर्वरित उमेदवार

शहादा - राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर -अनुप अग्रवाल
सिंदखेडा - जयकुमार रावल
शिरपूर - काशीराम पावरा
रावेर - अमोल जावले
भुसावळ - संजय सावकारे
जळगाव शहर - सुरेश भोळे
चाळीसगाव - मंगेश चव्हाण
जामनेर -गिरीश महाजन
जळगाव (जामोद) - संजय कुटे
देवली - राजेश बकाने
अमगांव - संजय पुरम
आर्मोली - कृष्णा गजबे
किनवट - भीमराव केरम
भोकर - क्षीजया चव्हाण
नायगाव - राजेश पवार
मुखेड - तुषार राठोड
हिंगोली - तानाजी मुटकुले
जिंतूर - मेघना बोर्डीकर
परतूर - बबनराव लोणीकर
बदनापूर -नारायण कुचे
भोकरदन -संतोष दानवे
फुलंब्री - अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे
गंगापूर - प्रशांत बंब
बगलान - दिलीप बोरसे
चंदवड - राहुल अहेर
नाशिक पुर्व - राहुल ढिकाले
नाशिक पश्चिम - सीमाताई हिरे
नालासोपारा - राजन नाईक
भिवंडी पश्चिम - महेश चौघुले
मुरबाड - किसन कथोरे
कल्याम पूर्व - सुलभा गायकवाड
डोंबिवली - रवींद्र चव्हाण
ठाणे - संजय केळकर
ऐरोली - गणेश नाईक
बेलापूर - मंदा म्हात्रे
दहिसर - मनीषा चौधरी
मुलुंड - मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व - अतुल भातखलकर
चारकोप - योगेश सागर
मालाड पश्चिम - विनोद शेलार
गोरेगाव - विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम - अमित साटम
विले पार्ले - पराग अलवणी
घाटकोपर पश्चिम - राम कदम
वांद्रे पश्चिम - आशिष शेलार
सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन
वडाळा - कालिदास कोळंबकर
मलबार हिल - मंगलप्रभात लोढा
कुलाबा - राहुल नार्वेकर
पनवेल - प्रशांत ठाकूर
उरन - महेश बाल्दी
दौंड- राहुल कुल
चिंचवड - शंकर जगताप
भोसरी -महेश लांडगे
शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोले
कोथरुड - चंद्रकांत पाटील
पर्वती - माधुरी मिसाळ
शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील
शेवगाव - मोनिका राजले
राहुरी शिवाजीराव कर्डिले
श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते
कर्जत जामखेड - राम शिंदे
केज - नमिता मुंदडा
निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर
औसा - अभिमन्यू पवार
तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख
अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख
मान -जयकुमार गोरे
कराड दक्षिण - अतुल भोसले
सातारा - शिवेंद्रराजे भोसले
कणकवली - नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक
इचलकरंजी - राहुल आवाडे
मिरज - सुरेश खाडे
सांगली - सुधीर गाडगीळ

भाजपची काल जाहीर झालेली दुसरी यादी

1. धुळे ग्रामीण - राम भदाणे
2. मलकापूर - चैनसुख संचेती
3. अकोट - प्रकाश भारसाकळे
4. अकोला पश्चिम - विजय अग्रवाल
5. वाशिम - श्याम खोडे
6. मेळघाड - केवलराम काळे
7. गडचिरोली - मिलिंद नरोटे
8. राजुरा - देवराम भोंगळे
9. ब्रह्मपुरी - कृष्णलाल सहारे
10. वरोरा करण - संजय देवतळे
11. नाशिक मध्य - देवयानी फरांदे
12. विक्रमगड - हरिश्चंद्र भोये
13. उल्हासनगर - कुमार ऐलानी
14. पेण - रावींद्र पाटील
15. खडकवासला - भीमराव तपकीर
16. पुणे छावणी सुनील कांबळे
17. कसबा पेठ - हेमंत रासणे
18. लातूर ग्रामीण -रमेश कराड
19. सोलापूर शहर मध्य - देवेंद्र कोठे
20. पंढरपूर - समाधान औताडे
21. शिराळा - सत्यजीत देशमुख
22. जत - गोपीचंद पडळकर

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+