Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हाती भाजपचा झेंडा अन् बॅरिकेड्स तोडून 'जय श्रीराम'चा नारा; प्रियांका गांधींच्या रॅलीत राडा!

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा आज नागपूरमध्ये रोड शो झाला. या रोडशो मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी राडा केल्याचे समोर आले आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा हातात घेऊन जय श्रीरामची घोषणाबाजी केल्याने काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, पोलिसांनी सावधानता बाळगल्याने मोठा अनर्थ टळला.

Maharashtra Assembly Election 2024

नागपूरात प्रचारासाठी आल्या होत्या प्रियांका गांधी!

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी यांचा नागपूर मध्य मतदारसंघात भव्य रोड शो काढण्यात आला. प्रियंका गांधी यांचा रोड शो संपत असतानाच बडकस चौकात भाजप कार्यकर्ते तिथे आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला.

संघ मुख्यालयाजवळ घडला प्रकार!

मिळालेल्या माहितीनुसार, बडकस चौक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाचा परिसर आहे. या परिसरात प्रियांका गांधींच्या रोड शोला विरोध दर्शविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पक्षाचे झेंडे दाखवत निदर्शने करण्यात आली.

काही कार्यकर्त्यांनी इमारतीवरूनही पक्षाचे झेंडे दाखवले. रॅलीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी भारत माता की जय...वंदे मातरम अशी घोषणांबाजी केली. तसेच त्यांनी भाजप उमेदवारांचे पोस्टरही झळकावले. परंतु, पोलिसांनी वेळीच सावधानता बाळगल्याने मोठा वाद टळला.

पोलिसांनी घेतले अनेकांना ताब्यात

रोड शोमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी घुसून राडा केल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यामुळे काही वेळ त्या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+