Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मौलाना नोमनींवरुन राजकारण तापलं, सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार. फडणवीसांचंही ट्विट

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिलेल्यांचे सोशल बाँयकाँट करा, असे आवाहन मौलाना सज्जाद नोमानी यांनी केलं होतं. नोमानीचा हाच व्हिडीओवरुन आता भाजपचे नेते किरीट सोमय्यांकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहून मौलाना सज्जाद नोमानींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. खडकवासलामधल्या सभेत फडणवीसांनीही नोमानींची ऑडिओ क्लिप ऐकवली होती. आता फडणवीसांनीही आज सकाळी ट्वीट करत झोपलेल्यांना जागे करा, असे आवाहन केले आहे.

Kirit Somaiya

किरीट सोमय्यांनी घेतला आक्षेप

मौलाना सज्जाद नोमानी यांचा एक व्हिडीओ भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी समोर आणला. लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिलेल्यांचे सोशल बॉयकॉट करा, असं आवाहन व्हिडीओद्वारे नोमानी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच व्हिडीओवरुन किरीट सोमय्यांनी नोमानींवर व्होट जिहादचा आरोप केला आहे. सोमय्यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्रही लिहित त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

फडणवीसांचं ट्वीट आलं चर्चेत

सज्जाद नोमानीच्या या क्लिपनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच गरमागरमी सुरु झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया आकाऊंटवरुन झोपलेल्यांना जागे करण्याचं आवाहन केलं.यही समय है, सही समय है, सोए हुओं को जगाने का, असं म्हणत फडणवीसांनी ट्वीट केलं आहे. आज सकाळी साडेदहा वाजता ते नेमकी कोणती भूमिका स्पष्ट करणार? झोपलेल्यांची झोप कशी उडवणार? याची उत्सुकता लागली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+