भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप लढत!कोण जिंकणार तिरुपती कोंढेकर की, श्रीजया चव्हाण?
Bhokar Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या प्रमुख गटांमध्ये महाराष्ट्रभर निवडणुकीची रंगत पाहायला मिळत असली, तरी भोकरमधील काँग्रेस विरुद्ध भाजप ही लढत विशेष लक्षवेधी ठरली आहे. या मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या वारशाचा विषय चर्चेत असून त्यांच्या कुटुंबातील श्रीजया चव्हाण, ज्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे, आणि काँग्रेसचे तिरुपती उर्फ पप्पू कोंढेकर हे प्रमुख उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
भोकरमधील काँग्रेस विरुद्ध भाजप अशी या निवडणुकीतील निर्णायक लढत विशेष लक्षवेधी ठरली आहे. काँग्रेसच्या विचारांवर कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास आहे, तर चव्हाण कुटुंबाच्या वारशाच्या माध्यमातून भाजपाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न होतोय. पण, मतदारांच्या निर्णयावर या मतदारसंघाच्या भवितव्याचा निर्णय अवलंबून आहे.

शंकरराव चव्हाण यांचा वारसा आणि काँग्रेसचा प्रभाव
श्रीजया चव्हाण या भाजपाच्या उमेदवार असून, त्यांच्या आजोबांनी केलेल्या सिंचन आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या कामांचा उल्लेख त्यांच्या प्रचारात केला जात आहे. त्यांच्या मते, शंकरराव चव्हाण यांच्या कामामुळे भोकरमधील शेती आणि पाण्याचे व्यवस्थापन सुधारले आहे. त्यांना वडील तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भक्कम साथ आहे. दुसरीकडे तिरुपती कोंढेकर यांनी मात्र स्वतःला घराणेशाहीच्या विरुद्ध लढणारा सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रचार सुरू केला आहे. त्यांनी काँग्रेसची विचारसरणी जपण्याचा निर्धार केला आहे.
गावागावात तिरुपती कोंढेकरांची रणनिती
कोंढेकर यांच्या प्रचारात युवा कार्यकर्ते पुढे आहेत. विविध जातीसमूहांचे मेळावे, गावगठ्ठे भेटी, संवाद बैठका यामधून मतदारांशी संपर्क साधण्यात येत आहे. त्यांच्या प्रचार मोहिमेत कृषी उत्पन्न बाजार समितीतील त्यांच्या योगदानाचे मुद्दे मांडले जात आहेत.
अशोक चव्हाण भाजपमध्ये जाताच मुलीला उमेदवारी
अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये गेले. श्रीजया चव्हाण यांना या मतदार संघात भाजपकडून उमेदवारी मिळाली. मात्र, मतदारांमध्ये काँग्रेस आणि शंकरराव चव्हाण यांचे विचार अजूनही प्रभावी आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून केले जाणारे आरोप आणि श्रीजया यांच्याबाबतचे राजकीय मुद्दे यामुळे मतदार निर्णय घेताना विचारात घेत आहेत.

गत निवडणुकीत काय झाले होते?
सन 2019 च्या निवडणुकीत कॉंग्रेसकडून अशोक चव्हाण मैदानात होते. त्यांनी भाजपचे बापूसाहेब गोरठेकर यांचा पराभव केला होता. चव्हाण यांना 1 लाख 40 559 तर गोरठेकर यांनि 43 हजार 114 मते मिळाली होती.
हेही वाचा : रविंद्र धंगेकर इज बॅक! हेमंत रासनेंनीही दाखवलाय दम; कसब्यात तिरंगी लढत रंगणार, कोण विजयी होणार? वाचा
मनोज जरांगे पाटील कुणाच्या पाठिशी?
या मतदार संघात मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक कुणाच्या पाठिशी राहणार यावरही निकालाचे गणित अवलंबून आहे. मतदार संघात मराठा मतदारांची संख्या निर्णायक आहे.
हेही वाचा : लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप! धीरज देशमुखांना रमेश कराडांचे तगडे आव्हान पण कोण जिंकणार?
हे आहेत प्रचारातील मुद्दे
अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस सोडली, त्यांनी कार्यकर्त्यांना गृहित धरू नये, घराणेशाहीला विरोध हे विरोधकांचे मुद्दे आहेत तर चव्हाण कुटुंबीयांनी केलेली विकासकामे ही हा भाजपचा मुद्दा आहे.
हेही वाचा : लातूर शहरात अमित देशमुखांसमोर डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी उभे केले आव्हान! कोण जिंकणार?
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications