बाळापूरचा 'गड' कुणाच्या ताब्यात? महाविकास, महायुती अन् वंचित बहुजन आघाडीत होणार लढत
Balapur Constituency UBT Nitin Deshmukh vs Vanchits Baliram Sirskar Dharhiwan Fundkar :पश्चिम विदर्भात किल्ले कमी आहेत. त्यातील एक किल्ला अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे आहे. पूर्वी हा विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसचा गड होता. त्याला नंतर वंचित बहुजन आघाडी म्हणजेच पूर्वीच्या भारिप बमसंने सुरुंग लाववा. नंतर सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वंचितच्या प्रा. धैर्यवर्धन फुंडकर यांना मात देत नितीन देशमुख यांनी या मतदारसंघावर शिवसेनेचा झेंडा फडकला. देशमुख आता ठाकरे गटात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून ते उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. दुसरीकडे महायुतीकडून शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला. परिणामी, यावेळी महाविकास, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे.
या ठिकाणी ग्रामीण मतदारांची संख्या अधिक आहे. स्थानिक तरुणांना आपल्याच भागात रोजगार मिळावा यासाठी एमआयडीसी व्हावी, जिल्ह्याच्या विकासासाठी केवळ अकोल्याचाच विकास होऊ नये तर जिल्ह्यातील शेवटच्या गावाचाही विकास व्हावा, अनेक गावांमध्ये अजूनही नळ योजना नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या डोक्यावर हंडा कायम आहे, परिसरातून महामार्ग गेलेला आहे. परंतु अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था कायम आहे आदी समस्या आता तरी सुटतील, अशी अपेक्षा मतदारांना आहे.

मुस्लिम मते निर्णायक
बाळापूर मतदारसंघात बाळापूर आणि पातूर या दोन तालुक्यांचा समावेश आहे. या मतदारसंघात मुस्लिम, मराठा, कुणबी आणि माळी मतांचे प्रमाण मोठे आहे. बाळापूर मतदारसंघात मुस्लिम मतदार हे निर्णायक भूमिका बजावतात. या मतदारसंघाने नेहमीच जातीच्या पलीकडे जात निवडणूक निकाल दिले आहेत.
राजकीय समीकरणे बदलली
महाराष्ट्राच्या राजकारणात मागील पन्नास वर्षांत झाला नाही, एवढा बदल या पाच वर्षांत झाला. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन प्रमुख पक्षात फूट पडून नवीन दोन पक्ष अस्तित्वात आले. त्यामुळे या दोन्ही पक्षांची शक्ती विभागली गेली. दरम्यान, बाळापूर विधानसभा मतदारसंघावर महायुतीकडून शिंदे गटासह अजित पवार गटानेही दावा केला आहे.
अजित पवार गटाकडून विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, संदीप पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे इच्छुक उमेदवार आहेत. शिंदे गटाने अजून आपले पत्ते उघड केले नाहीत. पण, शिंदे गट या मतदारसंघावरील दावा सोडणार नाही. पक्षाचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी या ठिकाणी तयारी सुरू केली आहे.
भाजप, वंचितकडून कोण?
महायुतीत मतदार संघ भाजपच्या वाट्याला आल्यास माजी आमदार बळीराम सिरस्कार, नारायणराव गव्हाणकर इच्छुक आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाचे उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, डॉ. रहमान खान आणि गजानन दांदळे यांनी तयारी सुरू केली आहे.
बळीराम सिरस्कर आता कुठे?
भारिप बमसंच्या तिकिटावर बळीराम सिरस्कार यांनी सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. पण, 2019 मध्ये त्यांनी भारिप म्हणजेच वंचित बहुजन आघाडीची साथ सोडली. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधून घेतले. पण, दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 12 ऑगस्ट 2022 मध्ये त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. आता भाजपकडून सिरस्कर या मतदारसंघात इच्छुक आहेत.
गत निवडणुकीत काय झाले होते?
बाळापूर विधानसभा मतदारसंघात 2019 झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नितीन देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडीचे धैर्यवर्धन पुंडकर यांचा 18 हजार 788 मतांनी पराभव करून विजय मिळवला. त्यापूर्वी 2014 मध्ये भाजप, शिवसेना आणि शिवसंग्रामच्या मतविभाजनातून येथे सलग दुसऱ्यांदा भारिप-बहुजन महासंघाच्या बळीराम सिरस्कार यांना लॉटरी लागली होती. सिरस्कार हे 6 हजार 939 मतांनी विजयी झाले होते. पण, आता सिसस्कार यांनी वंचितची साथ सोडली आहे.
लोकसभेत कॉंग्रेसला लीड
नुकतीच लोकसभा निवडणूक झाली. यात कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना बाळापूरमधून लिड मिळाली होती. या विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे 73 हजार 528, महायुतीचे अनुप धोत्रे यांना 63 हजार 684 तर वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना 59 हजार 130 मते मिळाली. त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे.
-
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
लिव्ह-इन, लॅविश लाईफ आणि ३५० कोटींची माया; 'मेजर इक्बाल' अर्जुनचा पडद्यामागचा शाही थाट -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?





Click it and Unblock the Notifications