Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Bailpola:लाडक्या सर्जा-राजाचा पोळा सण! का साजरा केला जातो? काय आहे महत्त्व अन् साजरा करण्याची पद्धत

Bailpola : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हणून विशेष महत्व आहे. हा महिना अतिशय पवित्र तसेच विविध सण-उत्सवांसाठी ओळखला जातो. श्रावण महिना संपून भाद्रपद महिना सुरु होतो. या श्रावणातील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणून पोळा सण ओळखला जातो. या दिवशी पिठोरी अमावस्या देखील असते. भारत हा कृषीप्रधान देश असल्याने शेतीशी संबधित पोळा या सणाला शेतक-यांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता म्हणून पोळा हा एकमेव सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

देशभरात पोळा हा वेगवगेळ्या नावांनी तसेच वेगवेगळ्य तिथींना साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण बैलपोळा नावाने साजरा केला जातो. तर कर्नाटकात याला बेंदूर असेही म्हटले जाते. सर्वच शेतकऱ्यांचा जिवाभावाचा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते. याच बैलामुळे शेतकऱ्याला शेतातील पिक पिकवण्यासाठी मोठी मदत होते. त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे.

Bailpola

बैळपोळा मुहूर्त, तिथी

पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या शेवटी पिठोरी अमावस्येच्या तिथीला बैलपोळा साजरा केला जातो यावर्षी 2 सप्टेंबर सोमवारी रोजी पहाटे 5 वाजून 21 मिनिटांनी अमावस्या प्रारंभ होणार असून ती 3 सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी 7 वाजून 24 मिनिटांनी संपणार आहे. उदयतिथीनुसार, अमावस्या 2 सप्टेंबर 2024 रोजी असून याच दिवशी बैलपोळा साजरा केला केला जात आहे.

पोळा सणाचे महत्त्व

पोळा सण हा शेतकरी त्यांचा जिवलग मित्र असलेल्या बैलांप्रती आणि त्याच्या कष्टांप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण या सणाचे महत्त्व म्हणजे बैलाच्याच जीवावर शेतकरी शेत नांगरतो, जमिनीतून धान्य पिकवतो. शेतकऱ्या प्रमाणे बैलही शेतात रात्रंदिवस राबतात, कष्ट करतात. बैलांना या दिवशी आराम दिला जातो.

अशी केली जाते बैलांची पूजा

पोळ्यादिवशी दिवशी बैलांकडून कोणतेही कष्टाचे काम करून घेतले जात नाही. त्यांना पूर्ण विश्रांती दिली जाते. या सणाच्या आदल्या दिवशी शेतकरी बैलांना आमंत्रण देतात. त्यांना नदीवर किंवा ओढ्यात नेऊन आंघोळ घालतात. पोळ्याच्या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात.

त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालून सजवतात आणि गावच्या वेशीतून वाजतगाजत त्यांची मिरवणूक काढतात. इतकंच नाही तर बैलांना जेवणासाठी या दिवशी पुरणपोळी करत नैवेद्य दाखवला जातो. घरातील स्त्रिया बैलांचे औक्षण करतात. या दिवशी प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+