Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

फडणवीस की मराठा मुख्यमंत्री..? उत्सुकता ताणली, आज अमित शहा करणार फैसला

Who is the Chief Minister of Maharashtra- महायुतीतील नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज सायंकाळी पाच वाजचा दिल्लीत बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील सत्ताकारण पाहता, मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे आज समजण्याची शक्यता आहे. महायुतीतील नेत्यांशी चर्चा करण्यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचे महासचिव विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा या तीन 'एम'वर या बैठकीत सविस्तर खलबते झाली. त्यामुळे मुख्ममंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस की अन्य कुणी मराठा नेता हा सस्पेंन्स वाढला आहे.

Devendra Fadnavis

शहा-तावडे यांच्यात झाली बैठक

आज महायुतीच्या तिन्ही नेत्यांची दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत बैठक आहे. त्यापूर्वी गृहमंत्री शहा यांनी महासचिव विनोद तावडे यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेत त्यांनी मराठा समाजाविषयी माहिती घेतली. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले तर, मराठा समाजाची मते बाजूला जातील का, आगामी निवडणुकांत काही फरक पडले का, मराठा समाजाचा मुख्यमंत्री केला तर काय होईल, आदी विषयांवर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. गैरमराठा मुख्ममंत्री केल्यास भाजपवर काही परिणाम होईल का, यावर या बैठकीत मंथन झाल्याची माहिती मिळत आहे.

भाजपसमोर नवीन चिंता

बुधवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. त्यानंतर दिल्लीपासून मुंबईपर्यंत वेगवान हालचाली सुरु झाल्या. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव अंतिम होणार की एखादा धक्कादायक निर्णय होणार? हे कदाचित आज स्पष्ट होईल. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यावर भाजपसमोर नवीनच चिंता निर्माण होणार आहे. महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास, मराठा समाजाच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलन सुरु करणार आहे. त्याचाही काय परिणाम होऊ शकतो, याबाबत चर्चा झाली.

फडणवीस की पुन्हा शिंदेच

मंत्रीमंडळाचा शपथविधी झाल्यावर मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करणार आहेत. गेल्यावेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी हे आंदोलन व्यवस्थित सांभाळले होते. त्याऊलट देवेंद्र फडणवीसांवर जरांगे यांचा राग आहे. त्यामुळे दिल्लीतून फडणवीसांऐवजी पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करुन धक्का दिला जाईल का, हेही पाहावे लागणार आहे. भाजपने राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंह यांना पक्षाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. भाजपमध्येही सातत्याने बैठकांचे सत्र सुरु आहे. यामुळे फडणवीस यांचे नाव निश्चित केले जाते की राजस्थान, मध्यप्रदेशप्रमाणे धक्कादायक नावे समोर येतात, हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.

मंत्रीमंडळाच्या सूत्रावरही होईल चर्चा

आज सायंकाळी अमित शाह पुन्हा महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहे. या बैठकीत हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपस्थित राहणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एनसीपीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. मुंबईत एनसीपी नेते छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. या बैठकांमध्ये मुख्यमंत्रीसोबत मंत्रिमंडळाच्या सूत्रावर चर्चा झाली. महायुती सरकारमध्ये भाजपला 20, शिवसेनेला 11-12 आणि एनसीपीला 10 मंत्रि‍पदे मिळण्याचा फॉम्युला तयार केला असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+