सतेज पाटील यांना धक्का; कोल्हापूर दक्षिणमधून भाजपचे अमल महाडिक यांचा विजय
Maharashtra Assembly Election 2024 : पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे नेते आणि पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजयाचे शिल्पकार सतेज पाटील यांना जबरदस्त धक्का बसला असून कोल्हापूर दक्षिण मतदार संघात त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा पराभव झाला आहे. कोल्हापूर दक्षिणची जागा भाजपचे अमल महाडिक यांनी जिंकली आहे.
कोल्हापूर शहरात आणि जिल्हाभरात सतेज पाटील यांचा गट आणि धनंजय महाडिक यांचा गट कार्यरत आहेत. या दोन्ही गटांत प्रचंड चुरस असते. 2019 पासून जिल्ह्यात सतेज पाटील गटाचा बोलबाला होता. कोल्हापूर दक्षिणची जागा सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी जिंकली होती. त्यांनी तत्कालीन आमदार अमल महाडिक यांचा पराभव केला होता. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सतेज पाटील हे मंत्री म्हणून कार्यरत होते. जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थावर देखील सतेज पाटील यांच्या गटाची सरशी झाली होती. 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आणि त्यांच्या विजयासाठी सतेज पाटील यांनी प्रचंड प्रयत्न केले आणि शाहू महाराज यांच्यासाठी विजयश्री खेचून आणली. त्यामुळे जिल्ह्याचा राजकारणात सतेज पाटील यांचे वजन आणखीनच वाढले होते.

विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्यावरच काँग्रेसची भिस्त होती. विशेषतः कोल्हापूर शहरात सतेज पाटील यांची प्रतिष्ठा कोणाला लागली होती. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सतेज पाटील यांनी राजेश लाटकर यांना उमेदवारी मिळवून दिली. पण काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्याला विरोध केला त्यामुळे सर्वानुमते शाहू महाराज यांची सून मधुरिमा राजे यांना उमेदवारी देण्यात आली. पण आयत्यावेळी मधुरिमा राजे यांनी माघार घेतल्यामुळे सतेज पाटील तोंडघशी पडले. आपला संताप त्यांनी जाहीरपणे व्यक्त केला. अशा परिस्थितीत कोल्हापूर उत्तरच्या माजी आमदार जयश्री जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सतीश पाटील यांना आणखी एक धक्का बसला होता. त्यामुळे कोल्हापूर शहरात नेमके काय होणार याबाबत पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड उत्सुकता होती.
कोल्हापूर दक्षिण हे सतेज पाटील यांचे घरचे मैदान मानले जाते. या मतदारसंघात सतेज पाटील यांचे पुत्र ऋतुराज पाटील आणि महाडिक गटाचे युवा नेते अमल महाडिक यांची लढत झाली. अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या या निवडणुकीत अंमल महाडिक यांनी ऋतुराज पाटील यांचा पराभव केला. कोल्हापूर जिल्ह्यात देखील काँग्रेसची दाणादाण उडाली असून उडाली आहे.












Click it and Unblock the Notifications