Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अजित पवारांची बहिण भावासाठी प्रचाराच्या मैदानात; वाचा, नेमकं काय म्हणाल्या...

बारामती विधानसभा मतदारसंघ सध्या सुपर हाँट ठरत आहे. या मतदारसंघात शरद पवार व अजित पवार या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही गटांकडून विजयाचे जोरदार प्रयत्न सुरु असतानाच शरद पवारांचे सगळे कुटुंब अजित पवारांच्या पराभवासाठी मैदानात उतरले आहे. ही निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्यात होत आहे. प्रचारात पवार कुटुंब अजित पवारांविरोधात दिसत असताना आता त्यांच्या सावत्र बहीण रजनी इंदुलकर प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी एक दिवस अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले आहे.

Ajit Pawar

अजितने मुख्ममंत्री व्हावे

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे असे रजनी इंदुलकर यांनी म्हटले आहे. इंदुलकर म्हणाल्या, अजित पवार जेव्हा-जेव्हा मला नमस्कार करतात, तेव्हा तेव्हा मी त्यांना हाच आशिर्वाद दिला आहे. त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची पात्रता आहे. त्यांच्यात सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा गुणही आहे. ते राज्याचे नक्की मुख्यमंत्री होतील, अशी माझी खात्री आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मते मागावी लागणं हे दुर्देव

पुढे बोलताना रजनी इंदुलकर म्हणाल्या, अजित पवार हे बारामतीचे नाही तर राज्याचे नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, यासाठीच मी प्रचारासाठी बाहेर पडलेय. त्यांच्यासाठी माझा जीव तुटतो आहे. अजित पवार कोणतंही काम सर्वोत्तम करतात. ते खूप मेहनती आहेत. ते पहाटेपासून लोकांची कामे करतात. परंतु आज मला त्यांच्यासाठी मते मागण्याची वेळ येत आहे. हे दुर्देव आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पवार कुटुंब अजितदादांविरोधात

लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली होती. त्यापूर्वी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडत सत्तेत सहभाग घेतला होता. तेव्हापासून पवार कुटुंबात दुही आहे. पवार कुटुंबातील सर्व सदस्य हे अजित पवारांच्या विरोधात गेले आहेत. त्यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनीही लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. त्याच श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार सध्या अजित पवार विरोधात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+