Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अजित पवारांनी पुन्हा शरद पवारांचं वाढवलं टेन्शन; 2 माजी मंत्री दादांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार

Ajit Pawar vs Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अजित पवार यांनी काका शरद पवार यांना पुन्हा धक्का देण्याचे डाव रचले आहेत. जळगाव जिल्ह्यातील शरद पवारांच्या पक्षाचे नेते तथा दोन माजी मंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत लवकरच प्रवेश करणार आहेत, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अजित पवारांचं पारडं जड भरणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री डॉ. सतीश पाटील हे 2 मे रोजी तर माजी मंत्री गुलाबराव देवकर हे लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश करणार आहेत. विशेष बाब म्हणजे गुलाबराव देवकर यांच्यासोबत दोन माजी आमदार, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका यांच्यासह बरेच मोठे पदाधिकारी हे अजित दादांच्या नेतृत्वाखाली येणार आहेत.

Ajit Pawar vs Sharad Pawar

डॉ. सतीश पाटलांनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक

डॉ. सतीश पाटील यांनी मंगळवारी पारोळा एरंडोल तालुक्यातील कार्यकर्त्यांचीही बैठक बोलावली आहे, जिल्हा बँकेत पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, तिल्लोतमा पाटील यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम निश्चित होणार आहे.

दोन्ही नेत्यांनी दिला पक्षप्रवेशाला दुजोरा

अजित पवारांच्या उपस्थितीत 2 मे रोजी मुंबई येथे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहोत. यासाठी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांशी मंगळवारी चर्चा करणार आहे. मात्र प्रवेश नक्की होणार असं माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी म्हटलं. तर अजित पवार गटात आपल्या प्रवेशाच्या तारखेबाबत मंगळवारी जिल्हा बँकेत बैठक होणार आहे. त्यानंतरच अधिकृत प्रवेशाची वेळ आणि तारीख सांगता येईल असं माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सांगितले आहे.

साताऱ्यातही शरद पवारांची या नेत्याने सोडली साथ

दुसरीकडे, सातारा जिल्ह्यात देखील शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यापाठोपाठ खासदार नितीन पाटील यांनी आणखी एका बड्या नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले आहे. सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देसाई यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला आहे. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+