Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दादांनी माणिकराव कोकाटेंना धो-धो धुतलं?, अँटी-चेंबरमध्ये नेमकं काय घडलं, वाचा ईनसाईड स्टोरी!

Ajit Pawar Vs Manikrao Kokate : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भवितव्यावरून जोरदार चर्चा रंगलेली आहे. शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका आणि विधानपरिषदेच्या अधिवेशनादरम्यान ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते टीकेचे धनी बनले.

Ajit Pawar took a dig at Manikrao Kokate

दरम्यान, आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी, त्यांचे मंत्रिपद कायम राहणार की त्यांना राजीनामा द्यावा लागणार, याचा फैसला होण्याची शक्यता आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी, आज सकाळी माणिकराव कोकाटे यांनी आपली मुलगी समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या अँटी-चेंबरमध्ये भेट घेतली.

या भेटीदरम्यान अजित पवारांनी कोकाटेंची चांगलीच खरडपट्टी काढली, त्यांना धो-धो धुतलं असल्याचे देखील चर्चा सुरू असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. चला तर जाणून घ्या की, दादांच्या चेंबरमध्ये नेमकं काय घडलं, त्याची ईनसाईड स्टोरी.

अजित पवारांची स्पष्ट नाराजी, कोकाटेंचा चेहराच बदलला!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. "कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. बोलताना आपण भान ठेवायला हवे," असे खडेबोल दादांनी कोकाटेंना सुनावले.

यानंतर माणिकराव कोकाटे यांनी आपल्या वर्तनाबद्दल दिलगिरी व्यक्त करत, भविष्यात अशा चुका घडणार नाहीत, असे आश्वासन दिले. ही छोटी भेट मात्र राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेची बनली आहे. पण या भेटीतील अजित पवारांच्या कठोर भूमिकेने कोकाटेंच्या अडचणी वाढल्याचे स्पष्ट झाले. यापुढे जर कोकाटे यांनी असे काही वर्तन केले तर त्यांच्यावर कारवाई नक्की होणार असे त्यातून दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी 'शासन भिकारी आहे' असे वादग्रस्त विधान केले होते, ज्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली. तसेच, सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोकाटे यांच्या या दोन्ही कृत्यांवर नाराजी व्यक्त केली होती. यामुळे अजित पवारांवर कोकाटेंचा राजीनामा घेण्याचा दबाव मोठ्या प्रमाणात वाढला होता.

दादा संतापले- कितीदा माफ करणार?"

माणिकराव कोकाटे यांचा कृषीमंत्रिपदाचा राजीनामा घेऊ नये, अशी मागणी घेऊन नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते मंत्रालयात अजित पवारांना भेटायला आले होते. या कार्यकर्त्यांनी अजित पवारांकडे आपली बाजू मांडली. त्यावर अजित पवारांनी त्यांना प्रतिप्रश्न केला, "किती वेळा चुका करणार आणि किती वेळा माफ करायचं?

आता राजीनामा नको म्हणून तुम्ही आलात. पण, ज्यावेळी मी स्वतःहून मंत्रिपद दिलं, त्यावेळी कुणीही आलं नव्हतं." अजित पवारांनी यावेळी 'सतत चुका होत असल्यामुळे आता माफी नाही,' अशी स्पष्ट भूमिका मांडल्याचे समजते.

प्री-कॅबिनेट बैठकीला अनेक नेत्यांची हजेरी!

अजित पवारांच्या दालनात आता प्री-कॅबिनेट बैठक सुरू झाली आहे, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. या बैठकीनंतर लवकरच अजित पवार माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय जाहीर करू शकतात. माणिकराव कोकाटेंच्या चुकीच्या वक्तव्यांची आणि वर्तनाची त्यांना मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोकाटेंच्या देहबोलीने सर्व काही सांगून टाकले?

अजित पवारांच्या दालनात प्री-कॅबिनेट बैठक झाली. ही बैठक संपल्यावर माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांपाठोपाठ बाहेर पडले. त्यावेळी माणिकराव कोकाटे यांची देहबोली बरेच काही सांगून गेली. आजच्या बैठकीत अजित पवारांनी नेहमीप्रमाणे अभय दिले नाही, असेच संकेत कोकाटेंच्या देहबोलीवरुन मिळत होते. तर दादांनी या बैठकीत चांगलेच झापल्याची चर्चा देखील सुरू झालेली आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+