Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शहाण्‍या थोडक्‍यात वाचला पठ्या, माझी सभा झाली असती तर? रोहीत पवार भेटताच अजितदादांचं मिश्किल वक्तव्य

Ajit Pawar Rohit Pawar meeting in Karad : विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्‍यासोबत आलेल्‍या आमदार रोहित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्‍याशी भेट झाली.रोहित पवारांनी त्यांनी नमस्‍कार केला. यावर दर्शन घे काकाचं,असे म्‍हणत अजित पवार यांनी शहाण्‍या...थोडक्‍यात वाचलास पठ्या, माझी सभा झाली असती तर..?" असे वक्‍तव्‍य करत रोहित पवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्‍छा दिल्‍या. हा व्हिडिओही समोर आला असून या भेटीची आणि वक्तव्याची मोठी चर्चा होत आहे.

महाराष्ट्राचे दिग्गज नेते यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्त कराड येथील प्रीतीसंगमावर असणाऱ्या समाधीस्‍थळी अभिवादन करण्‍यासाठी अजित पवार आले होते, त्यावेळी तेथे त्यांची रोहीत पवार यांच्याशी भेट झाली. त्यावेळी हा किस्सा घडला.

Ajit Pawar Rohit Pawar meeting in Karad
मुख्यमंत्रीपदाबाबत अजितदादांचे वक्तव्य

कराड येथील प्रीतीसंगमावर असणाऱ्या यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्त समाधीस्‍थळी अभिवादन करण्‍यासाठी ज्‍येष्‍ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्‍यमंत्री अजित पवार हे आले होते. अभिवादनानंतर त्‍याठिकाणी मुख्‍यमंत्रीपदाबाबत काय निर्णय झाला आहे, या विचारलेल्‍या प्रश्‍‍नावर अजित पवार यांनी आम्‍ही तिघे बसून एकत्र निर्णय घेणार आहोत असे म्हटले.

भाजपचे नेतेपद ठरल्यावर सीएमपदाचा निर्णय

अजित पवार म्हणाले, नुकतीच माझी राष्‍ट्रवादीच्‍या नेतेपदी निवड केली असून त्‍यापुर्वी एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्‍या नेतेपदी निवड केली आहे. भाजपचे नेतेपद ठरले नसून त्‍यानंतर मुख्‍यमंत्रीपदाचा निर्णय होईल.

नेमकं काय घडलं?

यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आले होते, त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार हेही आले. यावेळी अजित पवार यांच्याशी समोरासमोर रोहीत पवार यांची भेट झाली. यावेळी रोहित पवार यांनी त्‍यांना नमस्‍कार केला. यावर दर्शन घे काकाच,असे म्‍हणत अजित पवार यांनी शहाण्‍या...थोडक्‍यात वाचलास पठ्या, माझी सभा झाली असती तर असे वक्‍तव्‍य केले. यावेळी मोठी हशा पिकला. रोहीत पवाराच्या पाठीवर थाप देत अजित पवार यांनी रोहित पवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्‍छा दिल्‍या. याठिकाणी सकाळी अभिवादन केल्‍यानंतर शरद पवार हे निघून गेले, त्यानंतर जित पवार व इतरांचे आगमन झाले.

अटीतटीच्या लढतीत 1243 मतांनी रोहीत पवार विजयी

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि कर्जत- जामखेड मतदारसंघातून लढणारे रोहीत पवार अगदी थोड्या फार मतांच्या फरकाने म्हणजेच 1243 मतांनी रोहीत पवार विजयी झाले आहेत. भाजपचे प्रतिस्पर्धी राम शिंदे यांना या निवडणुकीत हार पत्करावी लागली. तो धागा पकडून अजित पवार यांनी रोहीत पवारांना उद्देशून हे मिश्किल वक्तव्य केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+