चेष्टा मस्करीत मित्रानेच मित्राला कात्रीने भोसकले, कुठं घडला थरार, गावही हळहळलं
Crime News : मित्र परिवारांमध्ये चेष्टा मस्करी होतच असते. तर कधी कधी चेष्ठा मस्करीची थेट वादातही रुपांतपरीत होते. मात्र, या थट्टेतून विपरीत घटना घडली आहे. मित्रानेच मित्राचा अनावधनाने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात दोन युवकांमध्ये झालेल्या चेष्टामस्करीत एका 20 वर्षीय युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मेडिकलमध्ये करत होते चेष्टा, अन् घडलं विपरीत...!
मुकुंदनगर परिसरात एका मेडिकलमध्ये दोन युवक एकमेकांची चेष्टा करत उभे असतांनाच शमसुद्दीन खान या आरोपीला चेष्टा सहन न झाल्याने त्याने जीशान खान या आपल्याच मित्रावर कात्रीने हल्ला केला. शुक्रवारी रात्री ही थरारक घटना घडली. या हल्ल्यामध्ये जीशान खान जखमी झाला होता. तर आज शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अनेकदा समोरच्या व्यक्तीची सहन करण्याची क्षमता पाहून आणि त्याच्या संवेदनांना ठेस पोहोचेल अशी करु नये. महाविद्यालयातही रॅगिंगच्या अशाच घटना घडत असतात. त्यातून, अनेकदा नैराश्याच्या भावनेतून विद्यार्थी टोकाचं पाऊल उचलतात, अशाही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.
मस्करी करताना व्हा सावध!
आपण कोणाची चेष्टा करत आहोत, त्याला सहन होती का याचा देखील विचार झाला पाहिजे. अन्यथा असा विपरीत परिणाम होतो अन् एक जीव हकनाक जातो.मेडिकल दुकानात सुरू असलेल्या मस्करीतून एकाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दोघांमधील भांडणांचा व्हिडिओ आला समोर
या दोघांमधील भांडणाचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला असून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी अद्याप फरार
तर, हल्ला करणारा आरोपी शमसुद्दीन खान हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान, या घटनेची शहरात जोरदार चर्चा असून चेष्टा-मस्करीलाही मर्यादा असायला हव्यात, असाच सूर नागरिकांचा उमटत आहे.












Click it and Unblock the Notifications