Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अचलपूरमध्ये बच्चू कडूंचा मोठा पराभव! तिरंगी लढतीत भाजपचे प्रविण तायडे यांचा विजय

Achalpur Election Result 2024 : प्रहार संघटनेचे नेते आणि दिव्यांगांचे तारणहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघात पराभव झाला आहे. या मतदारसंघावर भाजपने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

भाजपचे प्रवीण तायडे यांचा विजय

अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडू विरुद्ध भाजपचे प्रवीण तायडे यांच्यासह काँग्रेसच्या अनिरुद्ध देशमुख यांच्यात तिरंगी लढत होती. यात मात्र भाजपचे प्रवीण तायडे यांनी विजय संपादन करत मोठे यश आपल्या परड्यात खेचून आणले आहे. तर अमरावती विधानभेतून अखेर महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुलभा खोडके 2258 मतांनी विजयी झाला आहे.

Achalpur Election Result 2024 Big Defeat of Bachu Kadu

बच्चू कडू आमदार ते मंत्री आणि पराभव

बच्चू कडू हे अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेले व्यक्तिमत्व आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सामाजिककार्याच्या आवडीच्या जोरावर त्यांनी राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केले. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी सामाजिक कार्य सुरुवात केली. आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेतील स्थानिक नेतृत्वाशी बिनसल्यामुळे त्यांनी स्वतंत्र वाटचाल सुरू केली. पंचायत समिती ते आमदार आणि मग मंत्री असा त्यांचा प्रवास झाला पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागायच्या आधीच बच्चू कडू यांनी तर आपलंच सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला होता. एवढंच नाहीतर 'आम्हीच लहान पक्ष आणि अपक्षांसोबत संपर्क करत आहोत. आमचीच सत्ता येणार आहे आणि आम्ही सरकार स्थापन करणार आहोत. प्रस्थापितांनी थांबावं आणि लहान पक्षाचं सरकार यावं, अशाप्रकारचं गणित आम्ही मांडत आहोत. 10-15 जागा दुसऱ्या आघाडीच्या येतील. अपक्ष आणि लहान पक्षांचं सरकार आम्ही स्थापन करू', असं बच्चू कडू म्हणाले होते.

2004 सालापासून बच्चू कडू अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांनी स्थानिक जनतेच्या मनात स्वतःचे असे स्थान निर्माण केले. त्याचा फायदा त्यांना गेल्या चार निवडणुकांमध्ये मिळत आलेला आहे. पण या निवडणुकीत बच्चू कडू यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+