Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अभिजीत अडसूळांची हायकोर्टात धाव! अन्य पक्षाच्या उमेदवाराकडून महायुतीच्या फोटो, झेंड्याचा वापर प्रकरण

Abhijit Adsul : दर्यापूर मतदार संघात महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेने (शिंदे गट) कॅप्टन अभिजीत अडसुळ यांना उमेदवारी मिळाली आहे. याच दरम्यान दर्यापूर मतदार संघात वायएसपीकडून निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराने स्वत:च्या प्रचार फलकांवर महायुतीमधील नेत्यांचे छायाचित्र व भाजपचे झेंडे वापरले आहे.

वास्तविकता या मतदार संघात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी महायुतीचे अधिकृत उमेदवार कॅप्टन अभिजीत अडसुळ आहे. त्यामुळे अन्य पक्षाच्या उमेदवाराने स्वत:च्या प्रचारासाठी वापरलेल्या महायुती नेत्यांचे छायाचित्र व झेंड्यावर आक्षेप घेवून कॅप्टन अडसुळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Abhijit Adsul moves High Court over use of photos and flags of Mahayuti

कॅप्टन अडसुळ यांनी या संदर्भात याचिका दाखल केली असून त्या प्रकरणी त्यांनी निवडणूक आयुक्त, जिल्हाधिकारी अमरावती, दर्यापूर मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबधित 'वायएसपी'च्या उमेदवाराला प्रतिवादी केले आहे. या प्रकरणी कॅप्टन अभिजीत अडसुळ यांनी 6 नोव्हेंबरला सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दाखल घेवून सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फिरत्या निवडणूक पथकांना या तक्रारीबाबत तपासणी करण्यास सांगितले.

पथकाने तपासणी करुन सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दिलेल्या अहवालानुसार संबधित उमेदवाराकडून आदर्श आंचारसंहीतेचा भंग होत नसल्याचे दिसून येते. तसे पत्र महायुतीचे अधिकृत उमेदवार कॅप्टन अभिजीत अडसुळ यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने 9 नोव्हेंबरला दिले. त्यामुळेच कॅप्टन अभिजीत अडसुळ यांनी या पत्राविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेवून याचिका दाखल केली आहे.

महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे झेंडे, या पक्षांचे नेते यांचे छायाचित्र वापरण्याचा अधिकार आमचाच आहे. मात्र महायुतीची उमेदवारी नसणाऱ्या एका उमेदवाराने भाजप नेत्यांचे छायाचित्र व काही नेत्यांचे फोटो प्रचार फलकावर वापरले आहे, भाजपचे झेंडे वापरले, त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम पसरला आहे, मात्र मतदारांनी संभ्रमात राहू नये, असे आवाहन कॅप्टन अभिजीत अडसुळ यांनी केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+