तुमचं स्वप्न पुर्ण होणार, 'म्हाडा'चं घर मिळणार! महाराष्ट्रात 12 महिन्यात 19 हजार 497 घरं बांधणार
MHADA Lottery : म्हाडा तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर साकार करणार आहे, येत्या आर्थिक वर्षात घर घेण्याची मोठी संधी राज्यातील नागरिकांना मिळणार आहे. म्हाडा राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण विभागात १९ हजार ४९७ घरं बांधणार आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वर्ष २०२५-२०२६ च्या अर्थसंकल्पात 'म्हाडा'च्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण १९ हजार ४९७ सदनिकांचं बांधकाम करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं असून त्यासाठी अर्थसंकल्पात ९२०२.७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

म्हाडाचा वर्ष २०२४-२५ चा सुधारित आणि वर्ष २०२५-२०२६ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या वर्ष २०२५-२०२६ च्या १५९५६.९२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला आणि वर्ष २०२४-२५ च्या १०९०१.०७ कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे.
म्हाडा मुंबईत पाच हजार घरं बांधणार
म्हाडाच्या मुंबई मंडळाअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात ५,१९९ सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ५७४९.४९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कोकण विभागात सुमारे दहा हजार घरं बांधणार
कोकण मंडळाअंतर्गत ९९०२ सदनिकांची उभारणी करण्याचे उद्दीष्ट असून वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात त्यासाठी १४०८.८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पुण्यात १८३६, नागपुरात ६९२ घरं बांधणार
पुणे मंडळाअंतर्गत १८३६ सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ५८५.९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागपूर मंडळाअंतर्गत ६९२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात १००९.३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात सोळाशे घरं बांधणार
छत्रपती संभाजीनगर मंडळाअंतर्गत १६०८ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी २३१.१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नाशिक मंडळाअंतर्गत ९१ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अमरावती विभागात १६९ घरांचे उद्दीष्ट
अमरावती मंडळाअंतर्गत १६९ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी अर्थसंकल्पात ६५.९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
म्हाडाच्या या नव्या योजनांमुळे राज्यभरात नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर होणार आहे. मुंबई मंडळातर्फे अर्थसंकल्पात वरळी, नायगाव, परळ बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेसाठी २८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
जोगेश्वरी पूर्व येथील पीएमजीपी कॉलनी पुनर्विकास प्रकल्पासाठी ३५० कोटी रुपये, वांद्रे पश्चिम इथल५ परिध खाडी पुनर्विकास प्रकल्पासाठी २०५ कोटी रुपये, गोरेगाव सिद्धधार्थ नगर इथं सदनिका उभारणीसाठी ५७३ कोटी रुपये, परळ जिजामाता नगर इथल्या भूखंडावर मुले आणि मुलींच्या निवासासाठी वसतिगृह उभारणीसाठी २० कोटी रुपये, गिरणी कामगारांच्या घरासाठी ५७.५० कोटी रुपये, बोरीवली सर्वे क्र. १६० वरील योजनेसाठी २०० कोटी रुपये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील पुनर्वसन प्रकल्पासाठी २०० कोटी रुपये, पहाडी गोरेगाव प्रकल्पासाठी १७७.७९ कोटी रुपये, मालवणी झोपडपट्टी सुधार प्रकल्पासाठी ५० कोटी रुपये, मागाठाणे बोरीवली योजनेसाठी ८५ कोटी रुपये, एक्सर बोरीवली तटरक्षक दल योजनेसाठी ३० कोटी रुपये, गोरेगाव सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पासाठी २० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
कोकण मंडळांतर्गतच्या पाचपाखाडी-ठाणे सावरकर नगर येथे दोन मजल्यांचे हेल्थ केयर सेंटर व निवासी घरकुल योजनेसाठी १५ कोटी रुपये, माजिवाडे-ठाणे विवेकानंद नगर येथे १०० बेडचे वृद्धाश्रम व काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह उभारणीसाठी ३० कोटी रुपये, विरार बोळींज येथे क्लब हाऊस, जलतरण तलाव व भूखंड विकसित करणे कामासाठी ३३.८५ कोटी रुपये, वर्तकनगर-ठाणे पोलीस वसाहत इमारतींचा पुनर्विकास कामासाठी ९० कोटी रुपये, गोठेघर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेसाठी ११५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. नागपुर मंडळांतर्गत चंद्रपुर विशेष नियोजन प्राधिकरण योजनेसाठी ३७१.२० कोटी रुपये, टेक्सटाइल पार्क एम्प्रेस मिल योजनेसाठी ३५० कोटी रुपये अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे
-
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार?







Click it and Unblock the Notifications