Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ट्रम्पंना झटका! धमकीनंतरही झोहरान ममदानींचा महापौर निवडणुकीत मोठा विजय; भारताशी आहे खास संबंध

Zohran Mamdani : अमेरिकेतील सर्वात मोठ्या न्यूयॉर्क शहराच्या राजकारणात ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण बदल घडला आहे. भारतीय वंशाचे, ३४ वर्षीय झोहरान ममदानी यांची न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर म्हणून निवड झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रगतीशील विचारधारेचा विजय मानला जाणारा ममदानी यांचा हा विजय अनेक अर्थांनी खास आहे. त्यांचे हे यश त्यांच्या उत्कृष्ट भारतीय वारसा आणि आंतरराष्ट्रीय कुटुंबाच्या पार्श्वभूमीमुळे अधिक चर्चेत आले आहे.

Zohran Mamdani

खास चर्चेची बाब म्हणजे या निवडणुकीत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली पुर्ण शक्ती पणाला लावली होती व त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न कसोशीने केले होते. डेमोक्रॅटिक उमेदवार जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. ममदानी यांचा विजय हा डोनाल्ड ट्रम्पसाठी मोठा धक्का आहे. ममदानी जिंकल्यास न्यूयॉर्कला मिळणारा निधी बंद करण्याची धमकी त्यांनी दिली होती. बुधवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये, त्यांनी न्यूयॉर्कचे माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो आणि रिपब्लिकन उमेदवार कर्टिस स्लिवा यांचा पराभव केला.

ममदानींचा ऐतिहासिक विजय आणि रेकॉर्ड

सर्वात तरुण महापौर झालेले ममदानी १ जानेवारीपासून पदभार स्वीकारताच, ममदानी शतकापेक्षा जास्त काळातले न्यूयॉर्कचे सर्वात तरुण महापौर ठरतील.

पहिले मुस्लिम आणि दक्षिण आशियाई महापौर

न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर आणि दक्षिण आशियाई वंशाचे पहिले महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. या निवडणुकीत त्यांनी माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो आणि रिपब्लिकन कर्टिस स्लिवा यांचा पराभव केला.

महत्त्वाचे राजकीय धोरण आणि आव्हाने

झोहरान ममदानी यांच्या प्रचार मोहिमेत त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी आश्वासने दिली आहेत, जी आता त्यांच्यासाठी मोठी आव्हाने निर्माण करू शकतात: डेमोक्रॅटिक गव्हर्नर कॅथी होचुल यांचा श्रीमंतांवरील कर वाढवण्यास विरोध असल्याने, या महत्त्वाकांक्षी योजनांसाठी निधी कसा उभा करायचा हे मोठे आव्हान ममदानींसमोर असेल.

पार्श्वभूमी आणि राजकीय प्रवास

जन्म: १८ ऑक्टोबर १९९१, कंपाला, युगांडा.

शिक्षण: ब्रॉन्क्स हायस्कूल ऑफ सायन्स आणि आफ्रिकाना स्टडीजमध्ये पदवी (बोडॉईन कॉलेज, २०१४).

राजकीय सुरुवात: कॉलेज नंतर क्वीन्समध्ये त्यांनी कमी उत्पन्न असलेल्या घरमालकांना मदत करण्यासाठी फोरक्लोजर-प्रिव्हेंशन कौन्सिलर म्हणून काम केले.

विधानसभा सदस्य: २०२० मध्ये न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीच्या ३६ व्या जिल्ह्याचे (क्वीन्स) सदस्य म्हणून निवडून आले.

प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शक मीरा नायर यांच्याशी अनोखे नाते

झोहरान ममदानी हे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट दिग्दर्शक मीरा नायर (Mira Nair) यांचे सुपुत्र आहेत, हे अनेकांना माहित नाही. त्यांची आई मीरा नायर ह्या पंजाबी हिंदू पार्श्वभूमीच्या आहेत, तर त्यांचे वडील महमूद ममदानी हे युगांडाचे (भारतीय वंशाचे, गुजराती) प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आहेत. भारतीय वंशाचे ममदानी यांचा युगांडामध्ये जन्म, दक्षिण आफ्रिकेतील सुरुवातीचे शिक्षण आणि न्यूयॉर्कमधील राजकीय कारकीर्द यामुळे ते चार देशांशी संबंधित आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+