Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांची नवी यादी जाहीर; पाकिस्तान इथेही मागे, भारत कितव्या स्थानी? वाचा

World Army Ranking 2026 : जागतिक राजकारणात युद्धाचे ढग दाटून आले असताना आणि सत्तासंघर्षाचे केंद्र बदलत असताना, २०२६ ची 'ग्लोबल फायरपॉवर' रँकिंग समोर आली आहे. या अहवालाने संपूर्ण जगाला एक स्पष्ट संदेश दिला आहे की, आता आशियाई वाघाची गर्जना अधिक तीव्र झाली आहे. बलाढ्य अमेरिका, रशिया आणि चीनच्या मागोमाग भारत जगातील चौथी सर्वात मोठी लष्करी शक्ती म्हणून ताठ मानेने उभा आहे. मात्र, एकेकाळी पहिल्या दहामध्ये असणाऱ्या पाकिस्तानसाठी हा अहवाल 'सर्जिकल स्ट्राईक'पेक्षा कमी नाही; कारण आर्थिक कणा मोडल्याने पाकिस्तानची रँकिंग घसरली आहे.

World Army Ranking 2026

पाकीस्तान आता या यादीत थेट १४ व्या पायरीवर घसरला आहे. बदलत्या जगाचा हा नवा नकाशा नक्की कोणाचं वर्चस्व सिद्ध करतोय आणि भारताची शक्ती किती पटीने वाढली आहे? वाचा हा सविस्तर अहवाल...

महाशक्तींचा दबदबा: अमेरिका नंबर १

२००५ पासून सातत्याने आघाडीवर असलेला अमेरिका २०२६ मध्येही ०.०७४१ च्या स्कोअरसह जगातील पहिल्या क्रमांकाची सैन्य शक्ती ठरला आहे. प्रचंड संरक्षण बजेट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान अमेरिकेला अपराजित बनवते. युक्रेन युद्धाच्या दडपणाखाली असूनही रशियाने आपले दुसरे स्थान टिकवून ठेवले आहे, तर चीन तिसऱ्या क्रमांकावर असून आपले लष्करी आधुनिकीकरण वेगाने करत आहे.

भारतीय लष्कराची मोठी झेप

भारताने ०.१३४६ च्या 'पावर इंडेक्स' स्कोअरसह जगात चौथा क्रमांक पटकावला आहे. टॉप-५ मध्ये भारत, चीन आणि दक्षिण कोरियाची उपस्थिती हे सिद्ध करते की, आता जागतिक सत्तेचे केंद्र पश्चिमेकडून आशियाकडे सरकत आहे. भारताचे वाढते संरक्षण निर्यात धोरण आणि मजबूत मनुष्यबळ यामुळे भारत आता केवळ प्रादेशिक नव्हे, तर 'ग्लोबल प्लेयर' म्हणून उदयास आला आहे.

पाकिस्तानची चिंता वाढली!

ग्लोबल फायरपॉवरचा २०२६ चा अहवाल पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा देणारा आहे. २०२४ मध्ये ९ व्या आणि २०२५ मध्ये १२ व्या क्रमांकावर असलेला पाकिस्तान आता थेट १४ व्या पायदानवर फेकला गेला आहे. गेल्या तीन वर्षांतील ही सततची घसरण पाकिस्तानची कमकुवत आर्थिक स्थिती आणि संरक्षण क्षेत्रातील रखडलेले आधुनिकीकरण दर्शवते.

युरोपमध्ये मोठा उलटफेर: ब्रिटनला धक्का

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+