Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला रोखणारे 'सुपर लॉयर' नील कात्याल कोण आहेत?, किती आहे फी, जगभर का चर्चा?

Neal Katyal Trump Tariff Case : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षी व्यापार धोरणांना (Tariff Policy) सर्वोच्च न्यायालयात मोठा धक्का बसला आहे. आणीबाणी कायद्याचा आधार घेत ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ सर्वोच्च न्यायालयाने ६-३ अशा बहुमताने बेकायदेशीर ठरवले आहेत. ट्रम्प प्रशासनासाठी हा एक मोठा पराभव मानला जात असतानाच, या संपूर्ण कायदेशीर लढाईत ज्या व्यक्तीने आपल्या बुद्धिमत्तेने आणि युक्तिवादाने व्हाईट हाऊसला जेरीस आणले, ते नाव म्हणजे नील कात्याल.

Who Is Neal Katyal

कोण आहेत नील कात्याल?

शिकागो येथे जन्मलेले नील कात्याल हे एका भारतीय स्थलांतरित कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील अभियंता आणि आई डॉक्टर आहेत. उच्च शिक्षणासाठी त्यांनी डार्टमाउथ कॉलेज आणि येल लॉ स्कूलसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांची निवड केली. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती स्टीफन ब्रेयर यांच्याकडे क्लर्क म्हणून झाली. आज त्यांना अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील सर्वात प्रभावशाली वकिलांपैकी एक मानले जाते.

ट्रम्प यांच्याशी जुना 'कायदेशीर' संघर्ष

नील कात्याल आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील कायदेशीर संघर्ष नवा नाही.

२०१७ ची ट्रॅव्हल बॅन: ट्रम्प यांच्या वादग्रस्त 'प्रवास बंदी'च्या निर्णयाला कात्याल यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.

पुस्तकाद्वारे प्रहार : त्यांनी ट्रम्प यांच्याविरुद्ध "Impeach: The Case Against Donald Trump" नावाचे पुस्तक लिहून आपली भूमिका स्पष्ट केली होती.

ताज्या प्रकरणातील युक्तिवाद : टॅरिफ प्रकरणात त्यांनी न्यायालयात सिद्ध केले की, राष्ट्रपतींकडे असलेले अधिकार कायद्याच्या वर नाहीत. "संसदेला व्यापार नियंत्रित करण्याचा अधिकार आहे, पण राष्ट्रपती त्याचा मनमानी वापर करू शकत नाहीत," हा त्यांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.

जगातील सर्वात महागड्या वकिलांमध्ये स्थान: प्रति तास किती फी?

नील कात्याल यांची गणना जगातील सर्वात महागड्या वकिलांमध्ये केली जाते. रॉयटर्सच्या अहवालानुसार, त्यांचे कायदेशीर शुल्क प्रति तास $३,२५० (अंदाजे २ लाख ७० हजार भारतीय रुपये) इतके आहे. त्यांच्या प्रगल्भ कायदेशीर समज आणि अनुभवामुळे बड्या कॉर्पोरेट कंपन्या आणि संस्था त्यांची मदत घेतात.

ओबामा प्रशासनातील महत्त्वाचे पद

कात्याल यांच्या क्षमतेची प्रचिती २०१० मध्येच आली होती, जेव्हा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची अमेरिकेचे 'कार्यवाहक सॉलिसिटर जनरल' म्हणून नियुक्ती केली होती. या पदावर असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांत सरकारचे प्रतिनिधित्व केले. सध्या ते जॉर्जटाउन विद्यापीठात प्राध्यापक आहेत आणि एका नामांकित लॉ फर्ममध्ये भागीदार म्हणून कार्यरत आहेत.

५० हून अधिक ऐतिहासिक विजय आणि पुरस्कारांचा वर्षाव

नील कात्याल यांचा ट्रॅक रेकॉर्ड थक्क करणारा आहे.

सर्वोच्च न्यायालयातील अनुभव : त्यांनी आतापर्यंत अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात ५० हून अधिक खटले लढवले आहेत.

महत्त्वाची प्रकरणे : १९६५ च्या मतदान हक्क कायद्याचे समर्थन आणि जॉर्ज फ्लॉइड हत्या प्रकरणात विशेष अभियोक्ता म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

सन्मान : त्यांना अमेरिकेच्या न्याय विभागाचा सर्वोच्च 'एडमंड रँडॉल्फ पुरस्कार' मिळाला आहे. तसेच २०१७ आणि २०२३ मध्ये त्यांना 'लिटिगेटर ऑफ द इयर' (Litigator of the Year) म्हणून गौरवण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+