Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'खामेनी युगा'चा अंत: इराणची सूत्रे ज्यांच्या हाती आलीत ते अयातुल्ला अलिरेझा अराफी कोण, वाचा सविस्तर!

Ayatollah Alireza Arafi : पश्चिम आशियातील भू-राजकीय नकाशा कायमचा बदलला आहे. ३७ वर्षे इराणवर एकछत्री अंमल गाजवणारे ८६ वर्षीय सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी झाली आहे.

या भीषण सत्तापालटानंतर इराणच्या संविधानातील कलम 111 सक्रिय करण्यात आले असून, वरिष्ठ धर्मगुरू अयातुल्ला अलिरेझा अराफी यांची अंतरिम नेतृत्व परिषदेचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Who Is Ayatollah Alireza Arafi

'ऑपरेशन एपिक फ्युरी' आणि खामेनींचा अंत

शनिवारी अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या लष्करी आणि सरकारी तळांवर 'न भूतो न भविष्यती' असा हल्ला चढवला. या कारवाईत थेट सर्वोच्च नेत्याच्या कार्यालयाला लक्ष्य करण्यात आले होते. सुरुवातीला इराणने हे वृत्त फेटाळले असले तरी, अखेर खामेनींच्या निधनाची बातमी जगासमोर आली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी याला "जगासाठी मोठा बदल" असे संबोधले आहे. १९८९ पासून सुरू असलेल्या एका प्रदीर्घ अध्यायाचा अशा प्रकारे रक्तरंजित अंत झाला आहे.

कोण आहेत अयातुल्ला अलिरेझा अराफी?

अयातुल्ला अलिरेझा अराफी हे इराणच्या धार्मिक आणि राजकीय वर्तुळातील अत्यंत वजनदार व्यक्तिमत्व मानले जातात. ते इराणमधील वरिष्ठ धर्मगुरू असून 'गार्डियन कौन्सिल'चे महत्त्वाचे सदस्य आहेत. सध्याच्या अस्थिर काळात देशात शांतता राखणे, विखुरलेल्या सत्तेला एकत्र करणे आणि नवीन कायमस्वरूपी सर्वोच्च नेत्याची निवड होईपर्यंत प्रशासकीय नेतृत्व करणे ही त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. अराफी हे कट्टरपंथी विचारांचे असले तरी, प्रशासकीय कामात त्यांचा हातखंडा मानला जातो. संकटाच्या काळात देशाला दिशा देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

अंतरिम नेतृत्व परिषद : सत्ता कशी चालणार?

इराणच्या संविधानानुसार, सर्वोच्च नेत्याच्या अनुपस्थितीत देश एका व्यक्तीच्या हाती न राहता एका 'परिषदे'मार्फत चालवला जातो. या परिषदेत खालील महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे.

  • अयातुल्ला अलिरेझा अराफी: परिषदेचे प्रमुख आणि धार्मिक कायदेतज्ज्ञ.
  • मसूद पेझेश्कियान: इराणचे अध्यक्ष.
  • गुलाम-हुसेन मोहसेनी एझाई: मुख्य न्यायाधीश.

ही परिषद केवळ दैनंदिन प्रशासनच चालवणार नाही, तर युद्धसदृश परिस्थितीत लष्करी निर्णय घेण्याचे आणि 'एसेम्ब्ली ऑफ एक्सपर्ट्स'च्या माध्यमातून नवीन सर्वोच्च नेत्याची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल.

इराणसमोर उभी असलेली आव्हाने

खामेनींच्या मृत्यूनंतर इराण केवळ बाह्य लष्करी दबावाखाली नाही, तर अंतर्गत राजकीय उलथापालथीचाही सामना करत आहे.

  • लष्करी दबाव: अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले अजूनही थांबलेले नाहीत.
  • सत्ता संघर्ष : 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) आणि नागरी सरकार यांच्यात सत्तेवरून रस्सीखेच होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत.
  • प्रादेशिक परिणाम : हिजबुल्ला, हमास आणि हुथी बंडखोरांना मिळणारा इराणचा पाठबळ आता कोणत्या दिशेला जाईल, यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

जागतिक राजकारणावर परिणाम

हा बदल केवळ इराणपुरता मर्यादित नाही. पश्चिम आशियातील शक्ती संतुलन (Balance of Power) पूर्णपणे बिघडले आहे. अयातुल्ला अराफी यांच्या नेतृत्वाखालील इराण मवाळ भूमिका घेणार की अधिक आक्रमक होऊन बदला घेणार, यावर तिसऱ्या महायुद्धाची टांगती तलवार अवलंबून आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+