ट्रम्प यांचा बिग ब्युटीफूल कायदा काय आहे? अमेरिकी सिनेटमध्ये आज संमत, एलोन मस्कची खरमरती प्रतिक्रिया
What is Big Beautiful Act : अमेरिकी सिनेटमध्ये आज मंगळवारी २ जुलै २०२५ रोजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोठ्या कर सवलत आणि खर्च कपात विधेयकाला मंजुरी दिली आहे. उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी मतदानादरम्यान ५०-५० मतांची बरोबरी तोडून हे विधेयक मंजूर केले. ९४० पानांचा 'वन बिग ब्युटीफुल बिल अॅक्ट' हा ट्रम्प यांचा प्रमुख कायदा आहे.
आता या कायद्याचे परिणाम किती चांगले आणि वाईट होतील हे येणारा काळ सांगेल.पण दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यात शितयुद्ध रंगले आहे. हे बिल सिनेटने पास करताच या कायद्यावरुन ट्रम्प यांच्याशी वाद झालेले कट्टर विरोधक अब्जाधीश एलोन मस्क यांची प्रतिक्रीयाही आली आहे.

काय म्हणाले एलोन मस्क?
एलोन मस्क यांनी अब्जाधीश एलोन मस्क यांनी सोमवारी सांगितले की 'वन बिग ब्युटीफुल बिल' मंजूर झाल्यास ते एक नवीन पक्ष सुरू करतील. "जर हे मुर्ख खर्च विधेयक मंजूर झाले तर दुसऱ्या दिवशी अमेरिका पार्टीची स्थापना होईल, आपल्या देशाला डेमोक्रॅट-रिपब्लिकन युनिपार्टीला पर्याय हवा आहे, जेणेकरून लोकांना खऱ्या अर्थाने आवाज उठवता येईल," असे मस्क यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. सरकारी खर्च कमी करण्यासाठी मोहीम राबवणाऱ्या परंतु विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसच्या सदस्यांवरही मस्क यांनी टीका केली.
काय आहे हे विधेयके?
- 'वन बिग ब्युटीफुल बिल अॅक्ट' या विधेयकात लष्करी खर्चात १५० अब्ज डॉलर्सची वाढ आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सामूहिक निर्वासन कार्यक्रमाची तरतूद आहे.
- या विधेयकात ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात करांमध्ये ४.५ ट्रिलियन डॉलर्सची वाढ करण्याची तरतूद आहे. तर मेडिकेड आरोग्य विमा कार्यक्रमात १.२ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत कपात करण्याचा प्रस्ताव आहे.
- यामुळे सुमारे ८.६ दशलक्ष कमी उत्पन्न असलेल्या आणि अपंग अमेरिकन लोकांना त्यांच्या आरोग्य विम्यापासून वंचित ठेवता येईल.
विधेयकाला जोरदार विरोध
या विधेयकामुळे अब्जावधी डॉलर्सचे ग्रीन एनर्जी टॅक्स क्रेडिट्स देखील काढून टाकले गेले आहेत, पर्यावरण समर्थकांनी ईव्ही टॅक्स क्रेडिट परत करण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, रात्रीच्या सत्रात पॅकेजला केवळ डेमोक्रॅट्सकडूनच नव्हे तर रिपब्लिकन गटांकडूनही विरोध झाला होता, त्यानंतर हे विधेयक मंजूर झाले.
विधेयकाला विरोध करणारे रिपब्लिकन हे उत्तर कॅरोलिनाचे सिनेटर थॉम टिलिस, मेनचे सुसान कॉलिन्स आणि केंटकीचे रँड पॉल आहेत. विधेयक हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये परत जाईल हे विधेयक आता हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये परत जाईल, जिथे डेमोक्रॅट्स त्यात अडथळे निर्माण करू शकतात, तसेच रिपब्लिकन जे आरोग्यसेवा आणि अन्न सहाय्य कार्यक्रमांमध्ये कपात करण्याच्या कल्पनेला विरोध करत आहेत, असे एएफपीने वृत्त दिले आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications