Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अमेरिकेचा सुपर बॉम्ब 'बंकर बस्टर' काय आहे?, 60 मीटर जमीनी खाली लपलेला इराणचा अणु तळ कसा उडवला?

Iran-Israel War, What Is US Bunker buster : इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षामुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे. हे दोन्ही देश एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. या भागात, रविवार दि. 21 जून रोजी रात्री अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख भूमिगत अणुतळांवर अतिशय गुप्त आणि अचूक हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर, मात्र संपूर्ण प्रदेश तणाव आणि अनिश्चिततेच्या विळख्यात अडकला आहे. तर जगभरात देखील या हल्ल्यानंतर चिंता व्यक्त केली जात आहे.

या हल्ल्यानंतर आता, प्रश्न असा निर्माण होतो की, अमेरिका खरोखरच इतक्या खोलवर लपलेले अणुतळ नष्ट करू शकते का?, जर त्याचे उत्तर हो असे असेल, तर तो बॉम्ब कोणता आहे.

जो माती, खडक आणि अनेक मीटर जाडीच्या काँक्रीटमधून थेट शत्रूच्या सर्वात सुरक्षित बंकरपर्यंत पोहोचला?, आजच्या लेखात आपण या विषयीच जाणून घेणार आहोत. अमेरिकेच्या बंकर बस्टर कसा निर्माण झाला, तो कसा काम करतो आणि त्याची वैशिष्ट्ये नेमकी कशी आहेत, याविषयी आपण जाणून घेणार आहोत...!

what is america super bomb bunker buster

अमेरिकेने 'या' बॉम्बचा केला वापर!

जगात अशी अनेक धोकादायक शस्त्रे आणि अणुकार्यक्रम आहेत जे जमिनीत खोलवर लपलेले आहेत. तसेच, ते मजबूत काँक्रीट आणि दगडांनी झाकलेले आहे. सामान्य बॉम्बने त्यांना नष्ट करणे जवळजवळ अशक्यच आहे. अशा परिस्थितीत, 'बंकर बस्टर' उपयोगी पडतो.

हा बॉम्ब विशेषतः अशा दुर्गम आणि खोल तळांना नष्ट करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. यातील सर्वात शक्तिशाली बॉम्ब GBU-57A/B मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर (MOP) आहे, जो अमेरिकन हवाई दलाने विशेष मोहिमांसाठी विकसित केला आहे. अमेरिकेने इराणच्या भूमिगत अणु तळांवर असे 6 बॉम्ब टाकले.

हे ही वाचा : काय सांगता ! अमेरिकेने ठरवलं तर काही मिनिटात नष्ट होऊ शकतो इराण, अमेरिकेची ताकद किती?

Bunker buster : बंकर बस्टर म्हणजे काय?

बंकर बस्टर हा एक विशेष प्रकारचा बॉम्ब आहे जो माती, खडक किंवा काँक्रीटच्या जाड थरांमध्ये प्रवेश करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. हे बॉम्ब शत्रूचे लपलेले तळ, भूमिगत लष्करी बंकर आणि गुप्त अणु तळ नष्ट करण्यासाठी वापरले जातात, जिथे सामान्य बॉम्ब पोहोचू शकत नाहीत.

बंकर बस्टरची काय आहेत खास वैशिष्ट्ये?

  • हे बोईंग कंपनीने विकसित केले आहे आणि 2011 पासून अमेरिकन हवाई दल वापरत आहे.
  • हे 20 फूट लांब, 2.5 फूट रुंद आणि 13,600 किलो वजनाचे आहे (म्हणजे 3 हत्तींच्या वजनापेक्षा जास्त)
  • हा बॉम्ब 200 फूट (60 मीटर) पर्यंत खडक किंवा मजबूत काँक्रीटमध्ये प्रवेश करू शकतो.
  • त्यात 2,500 किलोपेक्षा जास्त स्फोटके आहेत, जी एका विशेष उच्च-घनतेच्या स्टीलच्या कवचात ठेवली जातात.
  • हे फक्त अमेरिकन बी-2 स्टेल्थ बॉम्बर विमानातूनच टाकता येते, जे रडारला न चुकता उडू शकते.
  • हा बॉम्ब खोलवर पोहोचतो आणि आत स्फोट होतो, ज्यामुळे भूमिगत बंकर आणि लपण्याची ठिकाणे पूर्णपणे नष्ट होतात.

हे ही वाचा : अमेरिकेच्या Iranवरील हल्ल्यानंतर PM मोदींची इराण राष्ट्राध्यक्षांशी संवाद, नेमकं काय म्हणाले?

बंकर बस्टर का बनवले गेले?

अनेक धोकादायक शस्त्रे आणि अणुकार्यक्रम जमिनीखाली खोलवर लपलेले आहेत. जुने बॉम्ब इतक्या खोलीपर्यंत पोहोचू शकत नव्हते. म्हणूनच अमेरिकेने हा अति-जड बॉम्ब तयार केला जेणेकरून अणु शस्त्रे न वापरता हे तळ नष्ट करता येतील, यासाठी अमेरिकेच्या वतीने विशेष संशोधन केले गेले व त्यांच्या हवाई दलात या हत्यारांचा समावेश करण्यात आला.

अमेरिकेने फोर्डोला का केले लक्ष्य?

अमेरिका आणि इस्त्रायलला माहिती होते की, इराणला अण्वस्त्रे बनवण्यापासून रोखायचे असेल, तर तेहरानपासून 125 किलोमीटर अंतरावर डोंगरात सुमारे 300 फूट खोलीवर बांधलेला फोर्डो प्रकल्प नष्ट करावा लागेल.

हे केवळ 14 टन वजनाचा एमओपीनेच शक्य होणार होते. ते 200 फूट जमिनीत प्रवेश करण्यास सक्षम आहे. इस्रायलकडे हे बॉम्ब नाहीत. त्यामुळे अमेरिकेकडून त्याचा वापर करण्यात आला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+