काय सांगता ! अमेरिकेने ठरवलं तर काही मिनिटात नष्ट होऊ शकतो इराण, अमेरिकेची ताकद किती?
इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे संपूर्ण मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच तापली आहे. यात अमेरिकेने उडी घेतल्यानंतर वातावरणात युद्धाचे सावट आणखी गडद झाले आहे. नुकत्याच 21 जून रोजी, अमेरिकेच्या अत्याधुनिक B-2 स्टेल्थ बॉम्बर्स विमानांनी इराणमधील तीन गुप्त आण्विक तळांवर शक्तिशाली हल्ले चढवले. या कारवाईत भूमिगत लष्करी सुविधा उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.

या घटनांनंतर जागतिक स्तरावर एक प्रश्न चर्चेत आला आहे तो म्हणजे जर अमेरिका पूर्ण ताकदीने इराणवर हल्ला करेल, तर संपूर्ण देश नष्ट करण्यास किती वेळ लागेल?
अमेरिकेची लष्करी ताकद किती घातक आहे?
अमेरिका ही जगातील सर्वात शक्तिशाली लष्करी राष्ट्र मानली जाते. तिच्या शस्त्रसाठ्यात B83 प्रकारचा अणुबॉम्ब, ट्रायडंट II D5 क्षेपणास्त्रे, मिनिटमॅन III ICBM, आणि टोमाहॉक क्रूझ मिसाईल्स यांचा समावेश आहे. हे शस्त्र अत्यंत अचूकतेने कोणत्याही देशाच्या संरक्षण यंत्रणेत प्रवेश करून थेट लक्ष्य नष्ट करण्यास सक्षम आहेत.
विशेषतः, B2 स्टेल्थ बॉम्बर्स ही विमाने रडारवर दिसत नाहीत आणि कोणत्याही हवामानात कार्य करू शकतात. त्यामुळे या विमानांच्या मदतीने अमेरिका अगदी अल्प वेळेत महत्त्वाची लक्ष्ये नेस्तनाबूत करू शकते.
इराणवर हल्ल्यासाठी किती वेळ लागेल?
- विशेषज्ञांच्या मते, जर अमेरिका पूर्ण क्षमतेने इराणवर हल्ला चढवते, तर इराणमधील महत्त्वाचे लष्करी आणि प्रशासकीय केंद्र फक्त 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंतच्या कालावधीत उद्ध्वस्त होऊ शकतात.
- आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (ICBM) अवघ्या 30 मिनिटांत लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतात.
- टोमाहॉक मिसाईल्स आणि स्टेल्थ बॉम्बर्स हे संयोजन मोठ्या प्रमाणावर हल्ल्यासाठी 1-2 तास पुरेसे आहे.
- मात्र, संपूर्ण देश नष्ट करणे केवळ लष्करी बाब नसून त्यामागे राजकीय, मानवी हक्क, जागतिक मतप्रवाह यांसारखे अनेक घटक आहेत.
इराणही तयार आहे प्रत्युत्तरासाठी
अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणने संयमाचे आवरण जरी दाखवले असले, तरी संयुक्त राष्ट्रांमध्ये इशारा देत म्हटले की, "प्रत्युत्तराची वेळ आमचं लष्कर ठरवेल." अमेरिकेने जर पुन्हा कारवाई केली, तर त्याचा संपूर्ण विनाश होईल, असा इशाराही दिला आहे.
होर्मुझ जलमार्गावरून दबाव वाढतोय
- या साऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, इराणच्या संसदेनं होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही सामुद्रधुनी जगातील 20% कच्च्या तेलाच्या व्यापाराचा मुख्य मार्ग आहे. यावर निर्बंध लादल्यास:
- तेलाच्या किंमती गगनाला भिडू शकतात
- भारत, चीन, पाकिस्तानसह आशियाई देशांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो
जगभरातील ऊर्जा पुरवठ्याची साखळी धोक्यात येईल
हा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी, अंतिम निर्णय इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी घेणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, इराण जर हा मार्ग बंद करतो, तर अमेरिका याला धोरणात्मक आव्हान मानून कठोर कारवाई करू शकते.
संपूर्ण इराण नष्ट करणे शक्य आहे का?
तांत्रिकदृष्ट्या बघितले, तर अमेरिका अत्यंत शक्तिशाली आहे. पण संपूर्ण देश नष्ट करणे ही गोष्ट केवळ ताकदावर अवलंबून नाही. चीन आणि रशिया इराणचे सहयोगी देश असून, त्यांच्या समर्थनामुळे परिस्थिती तिसऱ्या महायुद्धासारखी बनू शकते. म्हणूनच अमेरिका अधिक काळजीपूर्वक आणि ठोस धोरण घेऊन पुढे सरकण्याची शक्यता आहे.
इराण-अमेरिका संघर्ष एक नाजूक आणि स्फोटक वळणावर आहे. अमेरिकेकडे प्रचंड सैन्यबल असलं, तरी आंतरराष्ट्रीय राजकारण, मित्र राष्ट्रांचे समीकरण आणि जागतिक अर्थव्यवस्था यांचा विचार करता, 'संपूर्ण इराण नष्ट करणे' हे केवळ शक्यता असून वास्तवात अतिशय गुंतागुंतीचं आणि धोकादायक ठरू शकतं.
-
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Rajya Sabha Election 2026 Result : राज्यसभेच्या 37 जागांचा निकाल; पाहा विजेत्यांची यादी -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
Gold silver price today : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा ताजे दर -
Health News : जोडीदाराला किस करणं पडू शकतं महागात! वेळीच सावध व्हा, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
केरळमध्ये पुन्हा 'लाल वादळ' की काँग्रेसची सरशी? ओपिनियन पोलचे आकडे समोर; पाहा कोणाला मिळणार सत्ता! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
Oscars 2026 Winners : ऑस्कर पुरस्कारांची घोषणा हा चित्रपट ठरला सर्वात भारी; पाहा संपूर्ण विनर लिस्ट -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य







Click it and Unblock the Notifications