Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अमेरिकेच्या Iranवरील हल्ल्यानंतर PM मोदींची इराण राष्ट्राध्यक्षांशी संवाद, नेमकं काय म्हणाले?

PM Narendra Modi Speaks to Iran's President : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. एकीकडे क्षेपणास्त्र हल्ले होत आहेत, तर दुसरीकडे त्याचे परिणाम जागतिक पातळीवर दिसून येत आहेत. अशा तणावपूर्ण वातावरणात भारताने शांतता आणि संयमाचा संदेश दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः इराणचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मसूद पझ्कियान यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि सध्याच्या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. तर हा तणाव वाढवण्याऐवजी सर्व पक्षांनी एकत्र येऊन तोडगा काढण्यासाठी काम करावे असे सांगितले. या संकटातून बाहेर पडण्यासाठी संवाद आणि राजनयिकता हा एकमेव मार्ग आहे यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला.

israel iran war

इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष मसूद पझ्कियान यांच्याशी फोनवरून सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा केली आणि प्रदेशातील वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींनी ट्विटद्वारे माहिती दिली की, दोन्ही नेत्यांमध्ये अलिकडच्या घटनांबाबत गंभीर चर्चा झाली आहे. तणाव कमी करण्याची तातडीने गरज आहे आणि संवाद आणि राजनैतिक मार्गानेच यावर तोडगा काढता येईल, असे ते म्हणाले.

युद्धाची व्याप्ती सतत वाढतेय

इस्रायल आणि इराणमधील युद्ध आता १० व्या दिवशी पोहोचले आहे. या काळात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे, परंतु आतापर्यंत कोणत्याही बाजूने माघार घेण्याचे संकेत दिलेले नाहीत. सततच्या हल्ल्यांमुळे आणि प्रत्युत्तरामुळे हा प्रदेश अधिक अस्थिर झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, या युद्धामुळे तिसऱ्या महायुद्धाची भीतीही निर्माण झाली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+