Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जगात युद्धाची नांदी! इराणमध्ये स्फोट! मोसादवर संशय; इस्त्रायलचा लेबनानवर हल्ला, अमेरिकेची बाँम्बफेक

Warlike situation in the world powerful explosion in Iran, Israel attacks Lebanon : जगात शांतता नांदताना दिसत नाही, जिकडे तिकडे संघर्ष आणि संघर्षच आता दिसून येत आहे. संघर्षाच्या आगीत जगाची मध्यपुर्व दिशा जळताना दिसत आहे.

एकीकडे इराणमध्ये शक्तिशाली स्फोट झाले असून मिसाईल बनवणारे रसायन नष्ट करण्यात आले आहे तर दुसरीकडे इस्त्रायलने लेबनाॅनलर शक्तीशाली हवाई हल्ला केला आहे. हे काही कमी असतानाच अमेरिकाही हुती विद्रोह्यांवर बाॅम्बवर्षाव करत आहे.

Warlike situation in the world

इराणमध्ये शक्तिशाली स्फोट!

इराणमधील बंदर अब्बास शहरातील शाहिद राजाई बंदरात भीषण स्फोट झाला. यात 40 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे तर जवळपास चारशेहून अधिक जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार आग विझवण्यासाठी बंदर तात्पुरते बंद करण्यात आले होते.

Take a Poll
हा स्फोट इतका शक्तिशाली होता की अनेक किलोमीटर दूर असलेल्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये स्फोटानंतर मशरूमच्या आकाराचा ढग तयार झालेला दिसत आहे.

ओमानमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात अण्वस्त्र चर्चेची तिसरी फेरी सुरू असताना हा स्फोट झाला आहे. मात्र, या स्फोटाचा या चर्चेचा थेट संबंध अद्याप समोर आलेला नाही. या चर्चेचे नेतृत्व अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची करत असून, दोन्ही देशांतील तांत्रिक तज्ज्ञांचाही या चर्चेत सहभाग आहे.

लेबनाॅनवर इस्त्रायलचा हल्ला!

लेबनाॅन आणि इराण यांच्यासोबत एकाचवेळी इस्त्रायलने पंगा घेतला आहे. तर दुसरीकडे गाझापट्टीतही इस्त्रायलचा संघर्ष सुरु आहे. रविवारी लॅबनाॅनची राजधानी बेरुतच्या दक्षिण भागात इस्त्रायलने हवाई हल्ला केला. या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या एका तळावर हा हल्ला केला गेला तर दुसरीकडे हिजबुल्लाहने यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. लेबनाॅनने स्पष्ट केले की, हल्ला फारसा परिणामकारक नव्हता आग विझवण्यात आली असून कोणतीही प्राणहानी झालेली नाही. तर दुसरीकडे लेबनाॅनचे राष्ट्रपतींनी या हवाई हल्ल्याचा निषेध केला आणि अमेरिका आणि फ्रान्सला इस्त्रायलला थांबवण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिकेने केले हुती विद्रोहींना लक्ष्य

यमनमधील हुती विद्रोहींना अमेरिकेने लक्ष्य केले आहे. हुती विद्रोहींना अमेरिका जवळपास 15 मार्चपासून लक्ष्य करीत असून यमनमधील सुमारे आठशे जागी हल्ले केले आहेत. आतापर्यंतच्या हल्ल्यात जवळपास शेकडो हुती नेता आणि त्यांचे लोक मारले गेले.

हेही वाचा : पहलगाम हल्ल्यानंतर शाहिद आफ्रिदीने भारताविरुद्ध गरळ ओकली! असुदोद्दीन ओवैसींनी सुनावले खडे बोल, वाचा

हेही वाचा: Pakistan News एकही युद्ध जिंकलं नाही, मग पाकिस्तान त्यांच्या सैनिकांना पदके कशासाठी देतो? घ्या जाणून

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+