Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इथे एक नोकरी मिळणे कठीण, मात्र हा पठ्ठ्या 13 आयटी कंपनीत काम करायचा, धक्कादायक प्रकार उघडकीस

खूप काही शिकून किंवा अनेक डिग्री असताना अनेकवेळा नोकरी मिळणे शक्य होत नाही. त्यासाठी फार कष्ट करावे लागतात. अनेक ठिकाणी ऑनलाईन प्लेटफॉर्मच्या माध्यमातून आपला बायोडाटा पाठववा लागतो. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या नोकरीशी आपला बायोडाटा मॅच झाल्यानंतर कुठे पुढे नोकरी प्रोसेस पुढे सरकते. त्यानंतर अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. कागदपत्र पडताळणी, मुलाखती आणि सर्वात शेवटी पगार या सर्व गोष्टी जूळून आल्यानंत कुठे एक नोकरी मिळते. मात्र अमेरिकेत एका व्यक्तीने बनावट कागद पत्राच्या आधारे तब्बल 13 आयटी कंपनीत नोकरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या व्यक्तीने तब्बल 13 आयटी कंपनीत रिमोटव्दारे काम करत असल्याचे उघडकीस आले आहे. हा व्यक्ती 13 ठिकाणी आयटी कंपनीत काम करत असल्याचे समोर आल्याने एक खळबळ उडाली आहे. या प्रकरणी या व्यक्तील पोलिसांनी अटक केली आहे. या नोकरीतून या त्याने 8 कोटींपेक्षा जास्त रक्कम कमावली आहे.

iit job

ही घटना अमेरिकेतील न्यू जर्सी येथे घडली असून या व्यक्तीने वेगवेगळ्या कंपन्यांसाठी काम करताना बनावट ओळखपत्रे आणि कागदपत्रे वापरली आहेत. अमेरिकेच्या कायद्यानुसार, अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी 10 ते 20 वर्षे तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणाने तंत्रज्ञान क्षेत्रातील रिमोट व्दारे कामाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.

रिपोर्टनुसार हा व्यक्ती पूर्वी नेल सलूनमध्ये काम करायचा. त्याच्या दैनंदिन जीवनात जेव्हा तो विल्यम जेम्स नावाच्या दुसऱ्या माणसाच्या संपर्कात आला. हे दोघे एका गेमिंग अॅपवर भेटले. घरी बसून पैसे कमवण्याच्या या मार्गाने विल्यमनेच या माणसाला मदत केली. विल्यमने त्या माणसासाठी एक बनावट रिज्युम बनवला आणि त्यात त्याने हवाई विद्यापीठातून शिक्षण घेतल्याचे लिहिले. त्यांना 16 वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांनी गुप्त सरकारी प्रकल्पांवर काम केले आहे, असं सांगण्यात आलं.

पुढे असे झाले की या व्यक्तीला बनावट बायोडेटाच्या आधारे अमेरिकन सरकारी एजन्सी FAA (Federal Aviation Administration) मध्ये नोकरीही मिळाली. जिथे त्याला उड्डाणादरम्यान विमानाचे निरीक्षण करण्याचे काम मिळाले. त्याला एक सरकारी लॅपटॉप आणि सुरक्षा कार्ड देखील देण्यात आले, ज्याद्वारे तो सरकारी यंत्रणेत प्रवेश करू शकत होता.

रिपोर्टनुसार, या व्यक्तीने चीनमध्ये बसलेल्या उत्तर कोरियाच्या लोकांना लॅपटॉप दिला. ते रिमोट अॅक्सेसद्वारे अमेरिकेच्या सिस्टीममध्ये प्रवेश करायचे आणि त्याच्या नावाने काम करायचे. तो मिटींगलाही ऑनलाईन उपस्थित राहायचा आणि टीमशी बोलायचा. या संदर्भात, अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटले आहे की, हे फक्त वोंगचे प्रकरण नाही तर एक मोठे षड्यंत्र आहे, ज्यामध्ये उत्तर कोरियाचे ऑपरेटीव्हने अमेरिकन नागरिकांकडून नोकऱ्या घेतात आणि उत्तर कोरियाला पैसे पाठवतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+