इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात
Us iran war day 11 strait of hormuz vessels destroyed : अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा आज ११ वा दिवस असून संघर्षाने आता अत्यंत भीषण वळण घेतले आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल पुरवठा मार्गावर, म्हणजेच 'स्ट्रेट ऑफ होर्मूज' (Strait of Hormuz) जवळ अमेरिकेने इराणच्या १६ युद्धनौका उद्ध्वस्त केल्या आहेत. या नौका समुद्रात सुरुंग (Naval Mines) पेरण्यासाठी वापरल्या जाणार होत्या, असा दावा पेंटागॉनने केला आहे. या कारवाईमुळे आखाती देशांमधील तणाव शिगेला पोहोचला असून जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट पसरले आहे.

अमेरिकेचा 'सर्जिकल स्ट्राईक' आणि ट्रम्प यांचा इशारा
अमेरिकन संरक्षण विभागाने (पेंटागॉन) या कारवाईचे काही व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दांत सुनावले असून, "जर इराणने तेल मार्गात अडथळे आणले, तर त्यांच्यावर कधीही न पाहिलेला भीषण हल्ला केला जाईल," असा इशारा दिला आहे. इराण आंतरराष्ट्रीय तेल पुरवठा विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या संशयावरून अमेरिकेने ही मोठी कारवाई केली आहे.
इराणची प्रतिज्ञा: "तेलाचा एक थेंबही निर्यात होऊ देणार नाही"
अमेरिकेच्या या कारवाईनंतर इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड्स'ने (IRGC) आक्रमक पवित्रा घेतला आहे. "जोपर्यंत युद्ध थांबत नाही, तोपर्यंत आम्ही या भागातून शत्रू राष्ट्रांना आणि त्यांच्या साथीदारांना तेलाचा एक लिटरही निर्यात करू देणार नाही," अशी धमकी इराणने दिली आहे. या धमकीमुळे सौदी अरेबियाची तेल कंपनी 'अरामको'ने आपले टँकर्स दुसऱ्या मार्गाने वळवण्यास सुरुवात केली आहे.
युद्ध पेटलं!
- युद्धाचा विळखा विस्तारला: सौदी, इस्रायल आणि युएईमध्येही हल्ले हे युद्ध केवळ अमेरिका-इराणपुरते मर्यादित राहिलेले नाही.
- इस्रायल-लेबनॉन: इस्रायलने लेबनॉनमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात बुधवारी सात जणांचा मृत्यू झाला.
- सौदी अरेबिया: सौदीच्या संरक्षण मंत्रालयाने 'प्रिन्स सुलतान एअर बेस'कडे येणारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच पाडले आहेत.
- युएई (UAE): संयुक्त अरब अमिरातीनेही इराणचे हल्ले रोखले आहेत, मात्र यात ६ जणांचा मृत्यू झाला असून १२२ जण जखमी झाले आहेत.
भीषण जीवितहानी आणि निर्वासितांचे संकट
पेंटागॉनच्या मते, आतापर्यंत अमेरिकेने ५,००० हून अधिक लक्ष्यांवर हल्ले केले आहेत. या युद्धात आतापर्यंत इराणमध्ये १,२३०, लेबनॉनमध्ये ४८० आणि इस्रायलमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर लेबनॉनमधून ६ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.
हेही वाचा : इस्त्रायल-इराण युद्धाचा भडका! आता कपडे, जोडे आणि बांगड्याही महागणार; पाहा काय-काय होणार महाग?












Click it and Unblock the Notifications